Join us

डोरेमोनचा आवाज ऐकून चक्क पोटातल्या बाळानेही मारली किक...पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 16:22 IST

Viral Video of a Baby in Womb: डोरेमोनचे (doraemon) चाहते असणारी बच्चेकंपनी तर आपण नेहमीच बघतो. आता बघा या एका पोटातल्या बाळाची गंमत..

ठळक मुद्देसोनलने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. 

डोरेमोन, छोटा भीम, पेपा पिग असे कार्टून्स म्हणजे आजकालच्या मुलांचं विश्व. या मुलांना मग त्यांच्या आवडीच्या कॅरेक्टरचं चित्र असणाऱ्याच सगळ्या वस्तू पाहिजे असतात. ही कार्टून्स दिसली की बच्चेकंपनीचा दिवस कसा मजेशीर जातो. जन्माला आल्यानंतर बालकांचं असं कार्टून वेड आपण समजू शकताे. पण इथे तर पोटातल्या बाळाने एक गंमतच केली आहे. हे बाळ चक्क डोरेमोनचा आवाज ऐकून चांगलंच ॲक्टिव्ह होतं (Baby kicks in womb as mother talks like doreamon) आणि प्रतिसाद म्हणून त्याच्या आईला किक मारतं. बघा हा एक मस्त मजेशीर व्हिडिओ.(Funny Viral Video of a Baby in Womb)

 

बऱ्याच जणांना माहितीच आहे की सोनल कौशल (Sonal Kaushal) यांनी डोरेमोन या पात्राला आवाज दिला आहे. आज तिच्या आवाजाने डोरेमोन ओळखला जातो.

आलियाची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, तुम्हीही या चुका करत असाल तर सावधान!

डोरेमोनचा जरासा दबका, गोड, बारीक असणारा आवाज ऐकू आला की लहान मुलांचे कान लगेचच टवकारले जातात. डोरेमोनचा आवाज ही आज सोनलची ओळख झाली आहे. सध्या व्हायरल झालेला हा मजेशीर व्हिडिओही सोनल यांनीच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अवघ्या काही दिवसांत या व्हिडिओला लाखोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत.

 

त्याचं झालं असं की सोनल सध्या गरोदर आहे. ती जेव्हा डोरेमोन या पात्राला आवाज देण्यासाठी रेकॉर्डिंग करत असते, तेव्हा त्यावेळी तिचं पोटातलं बाळही अतिशय ॲक्टिव्ह झालेलं असतं.

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात नारळ फोडण्याची एकदम सोपी युक्ती, बघा भन्नाट आयडिया...

बऱ्याचदा काही ठराविक आवाज ऐकले किंवा ठराविक वेळ झाली की पोटातल्या बाळाची हालचाल वाढते, असा अनुभव अनेक गरोदर महिलांना येतो. तसंच सोनलचं बाळ डोरेमोनचा आवाज ऐकून प्रतिसाद देतं. त्याचा आवाज येताच बाळाची हालचाल वाढते आणि ते जोराने किक मारतं. सोनलने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललहान मुलं