Join us  

Funny Video :  बोंबला! पाठ खाजवण्यासाठी पठ्ठ्यानं केला जुगाड; क्रिएटिव्हीटी पाहून बायको झाली अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 3:50 PM

Funny Video : लोक जुगाडाच्या साहाय्याने अशा गोष्टी करतात, ज्या बघून कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो.

'जुगाड' ही अशी गोष्ट आहे ज्याचा भारतीय सर्वाधिक वापर करतात. कोणतेही काम सोपे करण्यासाठी लोक 'जुगाड' करतात. विचित्र जुगाडचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. लोक जुगाडाच्या साहाय्याने अशा गोष्टी बनवतात, ज्या बघून कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो.  कधी कधी जुगाड करणाऱ्याच्या कल्पनेचाही रागही येतो. (Man made such a jugaad to get rid of itching his wife also surprised to see)

व्हायरल झाला जुगाडाचा अनोखा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर जुगाडचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तो बनवणाऱ्या व्यक्तीवर राग येऊ शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सर्वात आधी आश्चर्य वाटेल की लोक अशा सुमार आयडिया कुठून आणतात.  पाठ खाजवण्यासाठी झोप मोड होऊ नये म्हणून या माणसानं ही शक्कल लढवली आहे.

घरात कॉक्रोच, उंदरांचा सुळसुळाट झालाय; 7 उपाय, उंदरं, कीटक कायम राहतील लांब

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला पाहून हसाल. सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा त्या माणसाची बायको हा जुगाड पाहते तेव्हा तिलाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे बघून हसायला लागते. उष्णतेमुळे, घामामुळे अनेक वेळा शरीराला खाज सुटते. यामुळे लोक नाराज होतात. या व्यक्तीच्या पाठीला उष्णतेमुळे खाज सुटत होती. यानंतर झोपेत असताना त्या व्यक्तीने खाज दूर करण्यासाठी हा धाडसी जुगाड केला.

वाढलेली ब्लड शुगर झटपट कंट्रोल करतील ५ उपाय;  डायबिटीस अचानक वाढण्याचं टेंशन नेहमी राहिल दूर

व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती व्यक्ती शांत झोपत आहे. त्याचवेळी पलंगाच्या शेजारी एक स्टँडिंग फॅन चालताना दिसत आहे. खाज सुटल्यामुळे त्या व्यक्तीची झोप खराब होऊ नये म्हणून त्याने मस्त जुगाड केला आहे. पंखा फिरत असताना, व्यक्तीची पाठ खाजवली जाते. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरलं जाणार नाही. rising.tech नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल