Join us

आलियापासून करिश्मापर्यंत... बघा सेलिब्रिटींचे दिवाळी लूक्स, सांगा कोण दिसतंय सगळ्यात जास्त सुंदर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2023 20:56 IST

Diwali celebration 2023 by bollywood celebrities: बॉलीवूड सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन कसं झालं, हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच उत्सूकतेचा विषय असतो. म्हणूनच पाहा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची दिवाळी कशी झाली... 

ठळक मुद्देआपल्या घरी सेलिब्रिटींनी कशी दिवाळी साजरी केली, त्यांचे कपडे- दागिने कसे होते, याची उत्सूकता तर त्यांच्या अनेक चाहत्यांना असतेच.

दिवाळीचा सण गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच जण आपापल्यापरीने आनंदात, उत्साहात साजरा करतात. बॉलीवूड सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत. सेलिब्रिटींच्या घरीही दिवाळीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते. अनेक सेलिब्रिटी तर आवर्जून दिवाळी सेलिब्रेशन पार्टीचेही आयोजन करतात. आता आपल्या घरी सेलिब्रिटींनी कशी दिवाळी साजरी केली, त्यांचे कपडे- दागिने कसे होते, याची उत्सूकता तर त्यांच्या अनेक चाहत्यांना असतेच. म्हणूनच आता पाहा सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या त्यांच्या पोस्ट... यावरून लक्षात येतं काेणाची दिवाळी किती उत्साहात साजरी झाली (Diwali celebration 2023 by bollywood celebrities)....

 

करिना कपूरचा दिवाळी उत्साह अतिशय दांडगा होता. तिला पतौडी आणि कपूर या दोन्ही कुटूंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद लुटता आला. पण तिच्या मुलांनी मात्र तिला काही नीट फोटोशूट करू दिले नाही. मुलांना सोबत घेऊन तिला फॅमिली फोटो काढायचा हाेता, पण तो काही शक्य झाला नाही. शिवाय भरीस भर म्हणून तिच्या धाकट्या मुलाने तिची रांगोळीही सगळी विस्कटून टाकली. एकंदरीतच मुलांच्या मजामस्तीमध्ये करिनाची दिवाळी धमाल साजरी झाली.

करिश्मा कपूरनेही दिवाळीचे खूप छान फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

महिनाभरातच केस वाढतील जोमाने, होतील लांबसडक.. घनदाट काळ्याभोर केसांसाठी वापरून बघा 'हा' होममेड स्प्रे

दिवा हातात धरून काढलेला तिचा फोटो अतिशय मोहक असून तिनेही कपूर फॅमिलीसोबत दिवाळीचा आनंद लुटला. यावेळी तिने घातलेले ड्रेस तिच्या चाहत्यांना विशेष आवडले.

 

आलियाची लग्नानंतरची ही दुसरी दिवाळी होती. दिवाळीसाठी तिने लाल रंगाचा घागरा घातला हाेता.

मुलं पळतात- विचित्र चेहरे करतात, करिना कपूरलाही दिवाळीत परफेक्ट फॅमिली फोटोसाठी करावी लागली धडपड

घागऱ्याच्या ओढणीवर सेक्विन वर्क केलेले होते. आलियाच्या लाल रंगासोबत मॅच करण्यासाठी रणबीरने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. एकंदरीतच मिस्टर ॲण्ड मिसेस रणबीर कपूरची दिवाळी राहासोबत छान साजरी झाली. 

"शुभ दीपावली !" अशी कॅप्शन टाकत कतरिनाने तिचे आणि विकी कौशलचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

फराळ तळून झाल्यावर भरपूर तेल उरलंय? बघा ३ गोष्टींसाठी तळण्याच्या तेलाचा कसा करायचा पुन्हा वापर

फ्लॉवर प्रिंट असलेल्या लाईट कलरच्या साडीत कतरिना सुंदर दिसतेय. शिवाय विकीनेही तिच्याशी मिळतेजुळते कपडे घातले आहेत. 

टॅग्स :दिवाळी 2023सोशल व्हायरलसोशल मीडियाआलिया भटकरिना कपूर