Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजच्या दरवाजाची 'ही' छोटीशी ट्रिक कमी करते उन्हाळ्यात भरमसाठ येणारं वीजबिल, पैसे आणि विजेची बचत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 17:26 IST

fridge door rubber mistakes that increase electricity bill : tips to reduce fridge electricity consumption at home : उन्हाळ्यात वीजबिलाचा आकडा वाढतो, करुन पाहा ही एक सोपी ट्रिक - पैशांची होईल बचत...

बऱ्याचदा आपल्याला लक्षात येते की, फ्रिज आतून व्यवस्थित थंड होत नाही किंवा त्यातील पदार्थ लवकर खराब होतात. अशावेळी आपल्याला वाटतं की, कदाचित फ्रिजचं कूलिंग सिस्टीम बिघडलं आहे, पण खरं कारण अनेकदा अगदी साधं असतं आणि ते म्हणजे फ्रिजच्या दरवाजावरील रबरी गॅस्केट (Rubber Gasket) लूज झालेली असते. हीच रबरी पट्टी फ्रिजचा दरवाजा घट्ट सील करून थंड हवा बाहेर जाण्यापासून थांबवते. त्यामुळे ती सैल झाली की थंड हवा बाहेर निघून जाते आणि फ्रिज नीट थंड राहत नाही. परिणामी, फ्रिजमधील थंड हवा बाहेर फेकली जाते आणि बाहेरील गरम हवा आत येते. यामुळे कॉम्प्रेसरवर सतत लोड येतो, फ्रिजचा थंडपणा कमी होतो आणि वीजबिल वाढते...(fridge door rubber mistakes that increase electricity bill).

जर तुम्हाला वाटत असेल की फ्रिजचे काम फक्त अन्नपदार्थ थंड ठेवणे आहे, तर तुम्हाला एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे. फ्रिजच्या दरवाजाच्या कडेला असलेली रबरची पट्टी, ज्याला तांत्रिक भाषेत 'गॅस्केट' (Gasket) म्हणतात, दिसायला जरी सामान्य असली तरी ती संपूर्ण फ्रिज सिस्टमचा मुख्य आधार असते. हीच पट्टी फ्रिजमधील थंड हवा बाहेर जाण्यापासून रोखते आणि बाहेरची उष्ण हवा आत येण्यापासून वाचवते. जर ही रबर पट्टी सुस्थितीत असेल, तर तुमचा फ्रिज कमी वीज वापरून उत्तम काम करतो आणि त्यातील अन्नपदार्थ जास्त काळ ताजे राहतात(tips to reduce fridge electricity consumption at home).

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

TOI (Times of India) च्या रिपोर्टनुसार, गास्केट ही एक लवचिक पट्टी असते, जी रबर, पीव्हीसी (PVC) आणि सिलिकॉन सारख्या मजबूत पण फ्लेक्सिबल मटेरियलपासून बनलेली असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे, दरवाजा बंद होताच ही पट्टी फ्रिजला पूर्णपणे चिटकून एक एअर-टाइट सील तयार करते. अनेक गास्केटमध्ये मॅग्नेटिक स्ट्रिप देखील असते, ज्यामुळे दरवाजा घट्ट चिटकून राहतो. हीच सीलिंग सिस्टीम फ्रिजच्या आत तापमान स्थिर राखण्यास मदत करते, ज्यामुळे कूलिंग सिस्टमला वारंवार जास्त मेहनत करावी लागत नाही आणि पर्यायाने विजेची बचत होते.

गॅस्केट फ्रिजला थंड कसे ठेवते?

जेव्हा तुम्ही फ्रिजचा दरवाजा बंद करता, तेव्हा हे गॅस्केट (Gasket) एक 'एअरटाइट सील' तयार करते. यामुळे फ्रिजमधील थंड हवा बाहेर पडत नाही आणि बाहेरची गरम हवा आत शिरू शकत नाही. जर हे सील व्यवस्थित नसेल, तर फ्रिजला आतील तापमान टिकवून ठेवण्यासाठी वारंवार कूलिंग करावे लागेल, ज्यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. या पट्टीसाठी रबरचा वापर केला जातो, कारण रबर लवचिक आणि मजबूतही असतो. हा रबर दरवाजा आणि फ्रिजची फ्रेम यांच्यातील अगदी लहान फटी देखील पूर्णपणे भरून काढते. तसेच, दिवसभरात अनेक वेळा दरवाजा उघडला किंवा बंद केला तरीही रबर आपल्या मूळ आकारातच राहतो, ज्यामुळे फ्रिजचे कुलिंग कायम टिकून राहते.

सामंथा प्रभू सांगते २१ दिवसांत वजन कमी करण्याचं  सिक्रेट, पोट होते कमी आणि दिसता एकदम फिट...

वीजबिल वाचवण्यासाठी 'गॅस्केट' कशी मदत करते?

जर तुमच्या फ्रिजचे गॅस्केट व्यवस्थित काम करत असेल, तर फ्रिजला आतील भाग थंड ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. मात्र, या पट्टीला छोटासा कट गेला असेल किंवा ती सैल झाली असेल, तर आतील थंड हवा सतत बाहेर पडू लागते. अशा वेळी फ्रिजमधील तापमान पुन्हा कमी करण्यासाठी कॉम्प्रेसरला वारंवार सुरू व्हावे लागते, ज्यामुळे विजेचा वापर प्रचंड वाढतो आणि पर्यायाने तुमचे वीजबिलही वाढते. हे गॅस्केट फ्रिजच्या आतील तापमान स्थिर राखण्याचे काम करते, जे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर बाहेरची गरम हवा फ्रिजमध्ये शिरू लागली, तर आतील अन्नाला बुरशी लागण्याची किंवा ते खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, गॅस्केट सुस्थितीत असल्यास फळे आणि भाज्या दीर्घकाळ ताज्या राहण्यास मदत होते.

खराब गॅस्केटमुळे होणारे नुकसान... 

फ्रिजची गॅस्केट जर फाटली असेल, सैल झाली असेल किंवा त्यावर खूप घाण साचली असेल, तर ती फ्रिजला पूर्णपणे 'सील' करू शकत नाही. यामुळे फ्रिजमधील थंडावा सतत बाहेर पडतो, ज्यामुळे कूलिंग कमी होते. बाहेरची हवा आत शिरल्यामुळे फ्रिजमध्ये ओलावा वाढतो, ज्यामुळे अन्नाला लवकर वास येऊ लागतो. हवा गळतीमुळे फ्रिजरमध्ये अतिरिक्त बर्फ जमा होऊ लागतो. आतील तापमान मेंटेन करण्यासाठी कॉम्प्रेसरला सतत काम करावे लागते, ज्यामुळे फ्रिजवर दबाव वाढतो आणि तो लवकर खराब होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Fridge door's rubber seal trick reduces electricity bill drastically in summer.

Web Summary : A loose fridge door rubber gasket lets cold air escape, forcing the compressor to work harder, increasing energy consumption and electricity bills. Replacing or cleaning the gasket ensures a tight seal, maintaining temperature and saving energy.
टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सअन्नसमर स्पेशल