बर्याचदा आपल्याला लक्षात येते की, फ्रिज आतून व्यवस्थित थंड होत नाही किंवा त्यातील पदार्थ लवकर खराब होतात. अशावेळी आपल्याला वाटतं की, कदाचित फ्रिजचं कूलिंग सिस्टीम बिघडलं आहे, पण खरं कारण अनेकदा अगदी साधं असतं आणि ते म्हणजे फ्रिजच्या दरवाज्यावरील रबरी गॅस्केट (Rubber Gasket) लूज झालेली असते. हीच रबरी पट्टी फ्रिजचा दरवाजा घट्ट सील करून थंड हवा बाहेर जाण्यापासून थांबवते. त्यामुळे ती सैल झाली की थंड हवा बाहेर निघून जाते आणि फ्रिज नीट थंड राहत नाही. परिणामी, फ्रिजमधील थंड हवा बाहेर फेकली जाते आणि बाहेरील गरम हवा आत येते. यामुळे कंप्रेसरवर सतत लोड येतो, फ्रिजचा थंडपणा कमी होतो आणि वीजबिल वाढते! या समस्येसाठी मेकॅनिकला बोलावून महागडी गॅस्केट बदलण्याची गरज नाही(Tips & Tricks Fridge Door Rubber Seal Repair 5 Minute Fix Cold Air Leak).
अशा परिस्थितीत, आपण आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या एका साध्या गोष्टीचा वापर करून फक्त काही मिनिटांत ही सैल झालेली रबरी गॅस्केट पुन्हा टाईट करू शकता आणि फ्रिजच्या आतील कुलिंग ( fridge door gasket repair) सिस्टीम पहिल्यासारखी करू शकता. कोणत्या सोप्या घरगुती ट्रिक्स (refrigerator rubber seal fix) वापरून ही रबरी गॅस्केट पुन्हा घट्ट आणि फिट करता येते आणि फ्रिजचं कूलिंग पुन्हा पूर्ववत करता येतं ते पाहूयात...
फ्रिजच्या दरवाज्यावर असलेले रबरी गॅस्केट सैल झाले हे कसे ओळखावे ?
१. जर तुम्ही फ्रिजचा दरवाजा बंद केल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये छोटासा गॅप दिसत असेल, तर याचा अर्थ फ्रिजची रबरी गॅस्केट सैल किंवा खराब झाली आहे.
२. जर फ्रिजच्या दरवाज्याच्या कडेने थंड हवा बाहेर येताना जाणवत असेल, तर रबरी गॅस्केट लूज झाली आहे असे समजावे.
३. फ्रिजचा दरवाजा आणि मेन बॉडी यांच्या मध्ये एक कागदाचा तुकडा अडकवून बघा. जर तो तुकडा सहज बाहेर आला, तर गॅस्केट सैल झाली आहे असे समजावे.
४. तसेच, जर फ्रिजमध्ये बर्फ जास्त प्रमाणात जमा होत असेल किंवा आतून पाणी गळत असेल, तर हे गॅस्केट खराब होण्याचे लक्षण आहे.
घरच्याघरीच लूज झालेली गॅस्केट टाईट करण्यासाठी घरगुती उपाय...
जर तुमच्या फ्रिजची रबर गॅस्केट खराब झाली नसेल आणि ती लूज पडली असेल तर ती तुम्ही सहजपणे दुरुस्त करू शकता. यासाठी फ्रिजचा रबर गरम पाण्याने स्वच्छ धुवून साफ करुन घ्यावा. यामुळे रबर लवकरच त्याच्या मूळ आकारात येतो. जर तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही हेअर ड्रायरच्या मदतीनेही रबर हलकेच गरम करू शकता. त्याचबरोबर, हे तपासा की गॅस्केट योग्य आणि सरळ आकारात आली आहे का ते देखील तपासून पाहा. असे केल्याने तुमच्या फ्रिजची गॅस्केट पुन्हा मूळ आकारात येईल आणि साफ झाल्यावर दरवाजा व्यवस्थित बंद होईल. याचबरोबर, दर आठवड्याला व्हिनेगर व पाणी समप्रमाणांत घेऊन यांच्या एकत्रित मिश्रणाने रबरी गॅस्केट स्वच्छ पुसून घ्यावी. यामुळे धूळ, बुरशी, आणि चिकटपणा निघून जातो. थोडं व्हॅसलिन जेल किंवा तेल गॅस्केटला लावल्याने रबर लवचिक आणि टाईट राहतो.
गॅस्केटची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा...
सर्वात आधी, फ्रिजच्या दरवाजाला जोर लावून बंद करू नका. अनेकदा, दरवाज्याच्या रबरवर खाद्यपदार्थांचा तेलकटपणा किंवा घाण साचते. याशिवाय, फ्रिजच्या गॅस्केटमध्ये तडा जाण्याचे एक कारण हे देखील आहे की, आपण त्याचा वापर नीट करत नाहीत. म्हणूनच, फ्रिजच्या दरवाज्याच्या गॅस्केटला वेळोवेळी साफ करत राहावे आणि साफ करण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचा वापर करू शकता.
