Join us

प्रेशर कुकरचे रबर सैल झाले, वाफ बाहेर येते? सोपे ५ उपाय, एकदम चटकन करा दुरुस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 14:13 IST

Tips & Tricks To Use Loose Gasket Of Pressure Cooker : Follow these methods when the gasket of the cooker is loose, the gasket will be tight in minutes : Fix Your Loose Pressure Cooker Gaskets In Minutes This 5 Easy Hack Works Every Time : प्रेशर कुकरची रबरी रिंग (गॅसकेट) सैल झाली तर नेमके काय उपाय करावेत, ते पाहूयात.

आपल्या स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे उपकरणं आहे. आपण रोज या प्रेशर कुकरचा वापर करून अगदी सहजपणे झटपट स्वयंपाक करतो. रोजचा स्वयंपाक करताना वेळ वाचवण्यासाठी (Tips & Tricks To Use Loose Gasket Of Pressure Cooker) आणि अन्नपदार्थ लवकर शिजवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. स्वयंपाक घरातील कुकर ते अती महत्वाचं भांडं असले तरी देखील, वेळेनुसार किंवा वारंवार वापरामुळे कुकरच्या झाकणातील रबरी रिंग सैल (गॅसकेट) होते( Follow these methods when the gasket of the cooker is loose, the gasket will be tight in minutes).

कुकरच्या झाकणाची रबरी रिंग सैल झाल्याने, प्रेशर कुकरचे झाकण योग्य पद्धतीने लागत नाही, कुकर प्रेशर धरत नाही, शिट्टी व्यवस्थित होत नाही किंवा वाफ गळून जाते, परिणामी अन्नपदार्थ योग्य पद्धतीने शिजत नाही. अशा परिस्थितीत, नवीन रिंग घेणे हा एक पर्याय असला तरी देखील प्रत्येकवेळी नवीन रिंग घेणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी, आपण घरच्याघरीच काही सोपे उपाय करून ही कुकरच्या झाकणातील सैल झालेली रबरी रिंग (गॅसकेट) पुन्हा नव्यासारखी घट्ट करु शकतो. प्रेशर कुकरची रबरी रिंग सैल झाली तर नेमके काय उपाय करावेत, ते पाहूयात(Fix Your Loose Pressure Cooker Gaskets In Minutes This 5 Easy Hack Works Every Time).

प्रेशर कुकरची रबरी रिंग (गॅसकेट) सैल झाली तर... 

१. तेल लावा :- प्रेशर कुकरच्या झाकणावर सैल झालेली रबरी रिंग (गॅसकेट) लावण्यापूर्वी, रबर आणि झाकणाच्या कडांवर (जिथे रबर बसतो) त्या भागात  बोटाने थोडंसं तेल लावा. तेल लावल्यामुळे त्या भागात एक प्रकारचा गुळगुळीतपणा तयार होतो, जो रबरला नीट सील होण्यात मदत करतो. यामुळे आत तयार होणाऱ्या वाफेची गळती थांबू शकते आणि रबर देखील एकाच जागी स्थिर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर, तेल लावल्याने रबरला लवचिकता (flexibility) मिळते. जर रबर खूप जास्त कडक किंवा सुका वाटत असेल, तर हा उपाय विशेषतः फायदेशीर ठरतो. 

रविवारी नाश्त्याला करा 'मलई ब्रेड विथ चाय', खास दुबई स्पेशल! घरच्याघरी करा दुबईची व्हायरल रेसिपी...

२. रबर गरम पाण्यात भिजवा :- जर रबर खूपच सैल झाला असेल आणि वारंवार झाकणामधून सटकून निघत असेल, तर हा सोपा उपाय नक्की करून पाहा. यासाठी एक पातेलं घ्या आणि त्यात पाणी ओतून ते व्यवस्थित गरम करा. या गरम पाण्यात सैल झालेला रबर २ ते ३ मिनिटांसाठी भिजत ठेवा. २ ते ३ मिनिटांनंतर तो रबर बाहेर काढा आणि तो थोडा फ्लेक्सिबल वाटू लागला की, लगेचच तो कुकरच्या झाकणावर नीट बसवा. गरम पाण्यातील वाफेमुळे  रबर थोडा नरम होतो आणि लवचिक बनतो, त्यामुळे तो झाकणावर चांगल्या प्रकारे फिट बसतो. जसजसा रबर थंड होऊ लागतो, तसतसा तो झाकणाच्या आकारात अगदी व्यवस्थित बसतो. 

३. रबरवर बेकिंग सोडा पेस्ट लावा :- रबरवर बेकिंग सोडा पेस्ट लावणे हा सर्वात उत्तम उपाय ठरु शकतो. सगळ्यातआधी, रबरला पाणी आणि डिश सोपने नीट धुवा. नंतर बेकिंग सोडा आणि पाण्याची घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट रबरवर लावा आणि सुमारे १५ ते २० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. यानंतर रबर पुन्हा पाण्याने नीट धुवा. बेकिंग सोडा रबरवर जमा झालेला तेलकट आणि चिकट थर काढून टाकण्यास मदत करतो, जो अनेकदा रबरला झाकणावर नीट व्यवस्थित पद्धतीने सील होण्यापासून अडवतो. या पद्धतीने रबराची छान स्वच्छता होईल आणि तो पुन्हा कुकरच्या झाकणावर योग्य प्रकारे बसू शकेल. 

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

४. रबरवर कणिक लावा :- सर्वप्रथम रबर नीट स्वच्छ धुवा आणि तो झाकणावर व्यवस्थित बसवा. आता झाकण कुकरवर लावा. जिथून वाफ बाहेर येत असेल, त्या बाजूला मळून घेतलेल्या कणकेचा एक पातळ थर लावा. ही कणिक त्या उघड्या जागेला सील करेल आणि वाफ बाहेर येऊ देणार नाही. यामुळे अन्न नीट शिजेल आणि प्रेशर कुकरचे झाकणही व्यवस्थित बसेल. कणिक खूप जास्त प्रमाणात लावू नका, कारण ती रबरवर चिकटून त्याचं नुकसान करू शकते. 

५. रबर फ्रिजरमध्ये ठेवून द्या :- प्रेशर कुकरचा सैल झालेला रबर फ्रिजरमध्ये ठेवणे हा देखील एक उत्तम उपाय आहे. यासाठी सैल झालेला रबर सुमारे ५ ते १० मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. थंडाव्यामुळे रबर थोडासा आकुंचन पावतो आणि त्याची लवचिकता (elasticity) थोडी बदलते. फ्रीजरमधून काढल्यानंतर, रबर ताबडतोब झाकणावर नीट बसवा. थंड झालेला रबर झाकणाच्या खाचांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे बसतो, यामुळे झाकण टाईट बसते.

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकिचन टिप्सहोम रेमेडी