Join us

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी लक्ष्मीजवळ, रांगोळीमध्ये लावा फुलांचे दिवे! सजावट होईल अतिशय सुंदर, देखणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2025 09:35 IST

Diwali Decoration Ideas: फुलांचे दिवे तयार करण्याची एक अतिशय सोपी पण खूप आकर्षक असणारी ही एक खास आयडिया..(DIY flower diya for Diwali)

ठळक मुद्देअशी फुलांच्या दिव्याची आरास पाहून सगळेच तुमच्या कल्पकतेचं कौतूक करतील. 

दिवाळी हा दिपोत्सव असताे. त्यामुळे छोट्या छोट्या पणत्यांपासून ते मोठमोठ्या समयांपर्यंत कित्येक दिवे आपण आपल्या घरात, अंगणात, रांगोळीमध्ये, देवाजवळ लावतो आणि सगळं घर उजळवून टाकतो. आता तर दिव्यांमध्येही खूप वेगवेगळे प्रकार मिळतात. बाजारात काही नवं आलं की ते बऱ्याच जणांच्या घरात दिसतं आणि त्यात काही नाविन्य राहात नाही. म्हणूनच यंदा तुमच्या घरची सजावट सगळ्यांपेक्षा वेगळी आणि हटके व्हावी यासाठी फुलांचे दिवे लावण्याचा विचार नक्की करा (Diwali Decoration Ideas). हे दिवे तयार करणं अतिशय सोपे आहे. तुम्ही ते लक्ष्मीच्या पुजेजवळ, रांगोळीमध्ये, तुमच्या हॉलमध्ये लावून ठेवू शकता.(DIY flower diya for Diwali)

फुलांचे दिवे कसे तयार करावे?

फुलांचे दिवे तयार करण्यासाठी आपल्याला काचेच्या वाट्या किंवा ग्लास लागणार आहेत. मोठ्या आकाराचे काचेचे बाऊल तुमच्याकडे असतील तरी चालेल. 

हे दिवे तयार करण्यासाठी झेंडू, ॲस्टर किंवा शेवंतीची फुलं वापरावी. जी फुलं थोडी जाडसर आणि पसरट असतील अशीच फुलं या दिव्यांसाठी परफेक्ट आहेत.

आता सगळ्यात आधी एक काचेची वाटी घ्या. काचेची वाटी पारदर्शक असावी. त्यामध्ये थोडं पाणी घाला. तुम्ही पाण्यामध्ये रंग घालून रंगीत पाणीही तयार करू शकता. यामुळे तुमचा फुलांचा दिवा अधिक आकर्षक दिसेल. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/816297264272910/}}}}

 

साधारण पाऊण वाटी भरेल एवढं पाणी त्या वाटीमध्ये घाला. त्यावर १ ते २ चमचे तेल घाला. आता एक फुल घ्या. थोडी मोठ्या आकाराची सुई घेऊन त्यामध्ये वात दुहेरी ओवून घ्या. यानंतर फुलाच्या देठाकडून सुई घाला वरच्या बाजुने ओढून घ्या. आता वरच्या बाजुने दोरा कापून घ्या. हे वात घातलेलं फुल वाटीमध्ये ठेवा आणि त्याची ज्योत प्रज्वलित करा. जर फुल वाटीतल्या पाण्यामध्ये तरंगत हलत असेल तर आजुबाजुने इतर फुलं लावून टाका. यामुळे वाटीतली फुलं हलणार नाहीत. अशी फुलांच्या दिव्याची आरास पाहून सगळेच तुमच्या कल्पकतेचं कौतूक करतील.  

English
हिंदी सारांश
Web Title : Floral Diyas for Diwali: Unique, beautiful decoration for Lakshmi Pujan.

Web Summary : Make flower diyas for Diwali using glass bowls, marigolds, or asters. Add colored water, oil, and a wick threaded through the flower. These floating floral lights create a unique, beautiful Diwali decoration.
टॅग्स :दिवाळी २०२५सुंदर गृहनियोजनगृह सजावट