Join us

लेकीचा आदेश म्हणून तिच्या बाहुलीच्या कपड्यांना इस्त्री करत बसला बाबा.. प्रेमळ बाबाचा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 13:01 IST

Cute Video Of a Father And His Little Girl: लहान मुलांनी सांगितलेली एखादी गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पालकांना काय काय कसरती कराव्या लागतात, याचं हे एक मजेशीर उदाहरण आहे..

ठळक मुद्देलेकीसाठी बाप काहीही करू शकतो, हे सांगणारा हा एक अतिशय गोड व्हिडिओ एकदा बघायलाच पाहिजे. 

राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट पुर्ण करावेच लागतात. त्याला काही पर्याय नसतो, असं आपल्याकडे बोललं जातं. आता राजहट्ट आणि स्त्री हट्टाचं काय ते माहिती नाही. पण बालहट्ट पुर्ण करण्यासाठी मात्र त्या बालकांच्या पालकांना अनेक कसरती कराव्या  लागतात, याचा रोजच अनुभव त्यांचे पालक घेत असतात. हट्ट पूर्ण झाला नाही, तर तार सप्तकांत रडण्याचं वरदान मुलांना  मिळालेलं असतंच. ते टाळण्यासाठी मग त्यांच्या पालकांना मुलांचं म्हणणं ऐकावंच लागतं. हे त्याचंच एक मजेशीर उदाहरण  आहे. लेकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रेमळ बाप नेमकं काय करतो आहे (Father ironing clothes of his daughter's doll), ते एकदा बघायलाच पाहिजे.

 

ortizfamily275 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खरोखरच एवढा छान आहे की आतापर्यंत त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

बॅग फाडली की जाळली, नक्की केलं काय? विमान प्रवासात बॅगचे हाल पाहून लोक चक्रावले, व्हायरल फोटो

या व्हिडिओमध्ये दिसणारा पिता आणि त्याची लेक कोणत्या देशातले आहेत, हे माहिती नाही. पण तो पिता आपल्या लाडक्या लेकीसाठी जे काही करतो आहे ते जगातला कोणताही पिता त्याच्या लेकीसाठी करू शकतो, हे मात्र नक्की.

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की तो पिता एका छोट्या बेडजवळ बसला आहे. त्याच्या बाजूला छोट्या छोट्या कपड्यांचा मोठा ढिग आहे. हे सगळे इवलेसे कपडे त्याच्या ४ ते ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीच्या बाहुल्यांचे आहेत.

झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

आणि तो एकेक कपडा घेऊन त्याला व्यवस्थित इस्त्री करतो आहे. व्हिडिओ घेणारी महिला त्याला विचारते की हे सगळं तू का करतो आहेस, त्यावर उत्तर म्हणून तो केवळ त्याच्या मागे बसलेल्या छोट्या मुलीकडे बघतो आणि तिच्या ऑर्डरनुसार हे सगळं चाललं आहे, हे सुचवतो. लेकीसाठी बाप काहीही करू शकतो, हे सांगणारा हा एक अतिशय गोड व्हिडिओ एकदा बघायलाच पाहिजे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया