Join us  

शाहरुखच्या गाण्यावर पाकिस्तानी बाप- लेकीचा सुंदर डान्स, कोणाला आलं हसू तर कोणाला रडू- व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 3:44 PM

Pakistani Father-Daughter Duo’s Dance: ६ ते ७ वर्षांची चिमुकली तिच्या वडिलांसोबत अशी काही नाचली की तिचा तो सुंदर डान्स पाहून अनेक जण इमोशनल झाले. 

ठळक मुद्देत्या नृत्याचा एक छोटासा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. 

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. आता लग्नसराई म्हटलं की नृत्य, गाणं ओघाने आलंच. कारण हल्ली लग्नसराईचा ट्रेण्डही बदलत चालला आहे. पुर्वी लग्नकार्यात फक्त पारंपरिक गाणी म्हटली जायची. पण आता मात्र एक खास दिवस डान्स- गाणी यासाठी राखीव ठेवला जातो. अशाच लाहोर येथे झालेल्या एका लग्नसोहळ्यात साधारण ७ ते ८ वर्षे वय असणाऱ्या एका चिमुरीने तिच्या वडिलांसोबत शाहरुख खानच्या गाजलेल्या गाण्यावर (famous song of Shah Rukh Khan) नृत्य केले (Pakistani Father-Daughter Duo’s Dance). त्या नृत्याचा एक छोटासा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. 

 

ridah_studioandirhadiaries या इन्स्टाग्राम पेजवरून अगदी एखाद्या मिनिटाचा असणारा तो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शाहरुख खान आणि काजोल यांच्या भूमिका असणारा 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातलं 'हाय हाय रे हाय ये लडका...' या गाण्यावर ती बापलेकीची जोडी नृत्य करत आहे. मुलीने आणि वडिलांनी दोघांनीही छानसे पारंपरिक कपडे घातले आहेत. मुलगी एवढी छोटीशी आहे की तिच्यासोबत नृत्य करण्यासाठी वडिलांना खाली बसूनच नाचावं लागत आहे.

संशोधनानुसार पुरुषांपेक्षा महिलांना जास्त झोपेची गरज! रोजच अपुरी झोप घेतल्यास ३ आजारांचा धोका

Father: A daughter's First Love अशी कॅप्शन असणाऱ्या या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांतच जवळपास ५ लाख लाईक्स मिळाले आहेत. आपण हा व्हिडिओ पाहूना खूपच इमोशनल झालो आहोत, असेही काही जणांनी कमेंटमध्ये लिहिले आहे.

घरात भाजी नसल्यास फक्त १ कांदा घेऊन करा झणझणीत चटणी- कुणाल कपूर स्पेशल रेसिपी

 हा व्हिडिओ पाहून आम्हाला आमच्या मुलीचे बालपण आठवले असे काही जण म्हणत आहेत, तर काही मुलींना या व्हिडिओमुळे त्यांच्या वडिलांची आठवण झाली, असे त्यांनी लिहिले आहे..  व्हिडिओ खूपच इमाेशनल असून पाहताना खूपच मजा आली, अशा आशयाच्या  अनेक कमेंट या व्हिडिओला मिळाल्या आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललहान मुलंनृत्यलग्नपाकिस्तानशाहरुख खान