Join us

चादरी धुतल्या तरी पावसाळ्यात लवकर वाळत नाहीत? ५ टिप्स- जाडजूड पांघरुणही वाळतील लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 16:27 IST

Even after washing the sheets, they don't dry quickly during the monsoon? 5 tips - Even thick sheets will dry quickly : बेडशीट, चादर, पांघरुण सगळंच वाळेल पटपट. पाहा काय कराल. अगदी सोप्या टिप्स.

पावसाळ्यात कपडे वाळवणे मोठा टास्क आहे. दोन ते तीन दिवस कपडे आंबट ओले राहतात. मात्र कपडे तर धुवायला हवेतच. फक्त कपडेच नाही तर चादर उशीचा अभ्रा, पांघरुण धुतल्यावर वाळायला फार वेळ लागतो. उन्हाळा आणि हिवाळा असला तरी जाड पांघरुण वाळायला वेळच लागतो. (Even after washing the sheets, they don't dry quickly during the monsoon? 5 tips - Even thick sheets will dry quickly)पावसाळ्यात तर मग विचारुच नका. कोल्हापूरी असो किंवा मग सॉफ्ट कॉटनच्या जाड चादरी वाळतच नाहीत. छान कडक सोडाच पूर्ण सगळीकडून वाळल्या तर पुष्कळ झाले. पावसाळी वातावरण चांगले चार महिने तरी टिकते. तेवढे दिवस पांघरुण न धुता ठेवणे शक्य नाही. वेळोवेळी चादर, पांघरुण, अभ्रे धुवायलाच हवेत. नाही तर अंगाला खाज सुटते. चादरीला वास येतो. पण मग वाळवण्याचे काय ? पाहा काही सोप्या टिप्स. यांचा वापर घरोघरी तसा केलाच जातो. तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या. 

 

१. पांघरुण, चादर आलटून पालटून वाळवायची. एका बाजूने छान वाळली की पलटायची आणि पुन्हा वाळवायची. असे काही तासांनी परत करायचे. त्यामुळे चादर सगळ्या बाजूंनी समान वाळेल आणि आंबट ओली राहणार नाही.

२. पांघरुण मोठे असले की आपण ते दुमडून वाळत घालतो. मात्र पावसाळ्यात ते लांबच्या लांब वाळत घालायचे. सुटसुटीत वाळत घालायचे. तरच वाळतील नाही तर आतल्या बाजूला उबतील आणि घास वास येईल. 

३. बाहेर पाऊस असताना चादर, पांघरुण घरात पंख्याखालीच वाळवा. पाऊस पडत असताना वाळत घातलेले कपडे आणखी आंबट होतात. त्यामुळे वालत नाहीत आणि वासही लागतो. पंख्याच्या वाऱ्याखाली चांगले वाळतात आणि लवकर वाळतात. 

४. चादरीवर गरम तवा ठेवायचा. सगळीकडे व्यवस्थित शेवकायचे. एका ठिकाणी ठेऊन द्यायचा नाही. चादर जळू शकते. सगळीकडे तवा फिरवल्यावर ती चादर पंख्याखाली वाळवायची. म्हणजे छान कडक वाळेल. पाणी विथळेपर्यंत बाथरुममध्ये ठेवायचे. व्यवस्थित निथळल्यावर वाळत घाला. असे केल्याने पाणी जास्त वेळ चादरीवर राहत नाही. पावसाचे पाणी लागणार नाही अशा ठिकाणीच वाळत घाला. 

 

 

५. केस वाळवण्यासाठी जो ड्रायर वापरला जातो. त्या ड्रायरच्या मदतीने चादर वाळवता येते. ड्रायरला गरम हवेसाठी ऑप्शन असतो. तो वापरायचा आणि छान चादर वाळवायची.           

टॅग्स :पाऊसहोम रेमेडीसोशल व्हायरल