Join us

वडिलांनी घेतला ट्रक, लेकीच्या पाऊलखुणा उमटवत केली गाडीची पूजा! पाहा बापलेकीचा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 14:31 IST

Social Viral: घरातल्या लेकी हे देवीचंच बाल रूप आहे, हे आपण वाचतो, ऐकतो आणि सोडून देतो... पण ते लक्षात ठेवून त्याचं प्रत्यक्ष अनुकरण करणारे एखादेच असतात.. तसाच हा एक पिता...

ठळक मुद्देअशा पद्धतीने करण्यात आलेला लेकीचा सन्मान खरोखरंच अतिशय भावनिक आहे..

आजही मुलगी झाली म्हणून नाराज होणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला आहेत.. मुलाची वाट बघत एका मागे एक मुली जन्माला घालणाऱ्यांचेही प्रमाण कमी नाही.. मुलगा- मुलगी यांना वाढविताना दोघांमध्ये दुजाभाव करणारेही भरपूर दिसतात. पण घरातल्या लेकीचं कोडकौतूक करून तिला अशा पद्धतीचा खराखुरा सन्मान देणारा मात्र एखादाच पिता असतो...(viral video of father daughter)

 

पहली बेटी धन की पेटी.. अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे.. पण या उक्तीनुसार किती लेकींना सन्मान मिळतो, हा खरोखरंच संशोधनाचा विषय. म्हणूनच तर सध्या सोशल मिडियावर एक अतिशय भावनिक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.. या व्हिडिओमध्ये पित्याने लेकीला दिलेला सन्मान पाहून अनेक जण नक्कीच भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ @aapki_harsha या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे..

 

यामध्ये असं दिसतंय की एका पित्याने दोन नव्या गाड्या घेतल्या असून गाडीचे पुजन सुरु आहे. साधारणपणे जेव्हा आपण नवं वाहन घरी आणतो तेव्हा त्यावर हळद- कुंकू वाहून त्या वाहनाची पुजा करतो. पण इथे तर या पित्याने खरोखर कमाल केली. त्याने ओल्या कुंकवाने भरलेली एक थाळी जमिनीवर ठेवली. त्यामध्ये त्याच्या जवळपास ७ ते ८ वर्षाच्या लेकीला उभं केली आणि तिचे कुंकवाने भरलेले तळवे गाडीच्या अगदी दर्शनी भागावर उमटवून नव्या गाडीचे पुजन केले.. अशा पद्धतीने करण्यात आलेला लेकीचा सन्मान खरोखरंच अतिशय भावनिक आहे.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया