Join us

पंख्यावर धुळीचे थर, काळाकुट्ट झालाय? २ घरगुती सोपे उपाय, डाग गायब-पंखे दिसतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2023 18:55 IST

Easy Way to Remove Sticky Dirt From Your Fan Blades पंखे साफ करायचे म्हणजे मोठं काम, वेळही लागतो; झटपट स्वच्छतेसाठी २ सोपे उपाय

उन्हाळा सुरु झाल्यावर जीवाची लाही - लाही होते. शरीराला थंडावा मिळावा यासाठी आपण पंख्याखाली अधिक वेळ घालवतो. उन्हाळ्यात पंखा २४ तास सुरु असतो. त्यामुळे तो लवकर घाण - काळकुट्ट होतो. त्यावर जर धूळ साचत गेली तर, त्याची स्पीड कमी होत जाते. पंख्यामधून हवा कमी येऊ लागते. पंख्याच्या पातींमधून धुळीतील किटाणू पसरतात. हे किटाणू शरीरात गेल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पंख्याला वेळोवेळी साफ करत राहा.

अनेकदा पंख्यातील काळपट डाग लवकर निघत नाही, जर पंखा पांढऱ्या रंगाचा असेल तर, आणखी खराब दिसतो. या टिप्सचा वापर करून पाहा, यामुळे पंखा लवकर साफ होईल, व नव्यासारखा चकचकीत दिसेल(Easy Way to Remove Sticky Dirt From Your Fan Blades).

पंखा साफ करताना करू नका ही चूक

अनेकदा लोकं पंखे साफ करताना थेट ओल्या कापडाचा वापर करतात, जे चुकीचे आहे. त्यामुळे पंख्यावर कोरडी माती जमा होते, व पंखा अधिक घाण होतो. पंखा साफ करताना प्रथम कोरड्या कपड्याने स्वच्छ करा, शक्य तितकी धूळ काढून टाका, मगच पंखा स्वच्छ करा.

फ्रिजमध्ये भरुन ठेवायच्या पाण्याच्या बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या ४ टिप्स, बाटली चकाचक झटपट

डिटर्जंट आणि लिंबाचा करा असा वापर

पंख्यावरील काळे डाग सहसा ओल्या कापडाने निघत नाही. यासाठी डिटर्जंट आणि लिंबाचा वापर करा. एका वाटीत पाणी घ्या, त्यात १ चमचा डिटर्जंट आणि लिंबाचा रस मिक्स करा. आता हे द्रव एका स्प्रे बाटलीत भरा, पंखा साफ करताना मिश्रण पंख्यावर स्प्रे करा, व कापडाने पुसून काढा.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

बेकिंग सोडा काढून टाकेल डाग

बेकिंग सोड्याचा वापर आपण अनेक कारणांसाठी करतो. पंखा साफ करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हा एक उत्कृष्ट क्लीनर आहे. यासाठी कोमट पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. तयार सोड्याचं पाणी पंख्यावर शिंपडा. व ओल्या कापडाने पंखा साफ करा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया