Lokmat Sakhi >Social Viral > कितीही घासा, टॉयलेटचे पिवळे डाग निघत नाही? ३ गोष्टी करा, नव्यासारखं लख्खं चमकेल टॉयलेट

कितीही घासा, टॉयलेटचे पिवळे डाग निघत नाही? ३ गोष्टी करा, नव्यासारखं लख्खं चमकेल टॉयलेट

Easy Way To Clean Toilet : तुम्हीसुद्धा बेसिन, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी काही ट्रिक्स वापरून साफसफाई लवकरात लवकर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 12:40 IST2025-08-17T12:33:24+5:302025-08-17T12:40:09+5:30

Easy Way To Clean Toilet : तुम्हीसुद्धा बेसिन, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी काही ट्रिक्स वापरून साफसफाई लवकरात लवकर करू शकता.

Easy Way To Clean Toilet : How To Clean Toilet Easily Toilet Cleaning Tips | कितीही घासा, टॉयलेटचे पिवळे डाग निघत नाही? ३ गोष्टी करा, नव्यासारखं लख्खं चमकेल टॉयलेट

कितीही घासा, टॉयलेटचे पिवळे डाग निघत नाही? ३ गोष्टी करा, नव्यासारखं लख्खं चमकेल टॉयलेट

घर हेल्दी ठेवण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं फार महत्वाचे असते. साफसफाई आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते (Easy Way To Clean Toilet). यासाठी टॉयलेटसीटच्या स्वच्छतेकडे खास लक्ष द्यायला हवं. कारण वॉशरूमध्ये सगळ्यात जास्त किटाणू असतात जे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतात. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही नव्यासारखी सीट चमकवू शकता. सध्या गौरी गणपतीसाठी साफ-सफाईची सर्वांनीच सुरूवात केली आहे. तुम्हीसुद्धा बेसिन, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी काही ट्रिक्स वापरून साफसफाई लवकरात लवकर करू शकता. (How To Clean Toilet Easily Toilet Cleaning Tips)

टॉयलेट क्लिनिंगसाठी उत्पादनं निवडताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी चांगल्या ब्रशचा वापर करा, आठवड्यातून एकदा किंवा वेळ असल्यास रोज टॉयलेटचं भांड स्वच्छ करा, ब्लिच, अमोनिया, सल्फेट अशा घातक केमिकल्सचा वापर टॉयलेट क्लिनिंगसाठी अजिबात करू नका (Ref). सुगंधित टॉयलेट क्लिनरर्सचा वापर करू नका. स्पॉट क्लिनिंग म्हणजेच ज्या ठिकाणी डाग आहेत ते लवकरात लवकर क्लिन करा.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

तुम्ही टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी बेकींग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. यातील एसिडीक गुण सीटवर जमा झालेले हट्टी डाग काढते आणि टॉयलेट किटाणूरहीत होते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बेकिंग सोडा छिंपडा. नंतर त्यावर व्हिनेगर स्प्रे करा. ही पेस्ट जवळपास १५ ते २० मिनिटं तशीच लावून सोडा. डागांना स्क्रब किंवा ब्रशच्या साहाय्यानं व्यवस्थित साफ करून घ्या. शेवटी पाण्यानं स्वच्छ धुवा.

लिंबाचा रस आणि मीठ

लिंबाचा रस एसिडीक असतो ज्यामुळे टॉयलेट सीट व्यवस्थित साफ होते. यामुळे हट्टी डाग निघून जातात. टॉयलेट सीटवर लिंबाचा रस घाला नंतर त्यावर मीठ घाला मग ही पेस्ट १५ ते २० मिनिटं तशीच राहू द्या. त्यानंतर ब्रश किंवा स्पॉन्जच्या साहाय्यानं डाग स्वच्छ करा. नंतर सीट पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या.

बोरेक्स आणि व्हिनेगर

यासाठी १ कप बोरेक्स टॉयलेट सीटवर छिंपडा नंतर १ कप व्हिनेगर बोरेक्सवर घाला. १० ते १५ मिनिटं तसंच ठेवून द्या. नंतर एका मायक्रोफायबर कापडानं साफ करून घ्या. हे सोपे उपाय कमी खर्चात टॉयलेट, बाथरूम स्वच्छ ठेवतील आणि दुर्गंधही येणार नाही.

Web Title: Easy Way To Clean Toilet : How To Clean Toilet Easily Toilet Cleaning Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.