Join us
Daily Top 2Weekly Top 5

वॉशिंग मशीनची आतपर्यंत सफाई करण्याचे सोपे उपाय, काही मिनिटांमध्ये दूर मळ-माती; होईल चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:41 IST

Washing Machine Celaning Tips : वॉशिंग मशीनची वेळोवेळी साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यात आता दिवाळी सुद्धा समोर आली आहे. अशात काही सोपे उपाय पाहुयात.

Washing Machine Celaning Tips : वॉशिंग मशीन ही प्रत्येक घरातील एक महत्वाची मशीन असते. कारण याद्वारे कमी वेळात आणि स्वच्छ कपडे धुतले जातात. पण मशीन ती शेवटी मशीनच याचा जर जास्त वापर केला तर आत डिटर्जंटचे कण जमा होतात आणि तेच नंतर घाणीत रूपांतरित होतात. ही घाण मशीन खराब करू शकते आणि सोबतच मशीनचं लाइफही कमी होतं. म्हणूनच वॉशिंग मशीनची वेळोवेळी साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यात आता दिवाळी सुद्धा समोर आली आहे. 

वॉशिंग मशीन स्वच्छ करण्याचे सोपे उपाय

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

मशीनच्या ड्रममध्ये २ कप व्हिनेगर घाला आणि मशीन हाय टेंपरेचरवर चालवा. नंतर अर्धा कप बेकिंग सोडा टाका आणि पुन्हा एकदा चालवा. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मशीनमधील घाण, चिकट मळ व बॅक्टेरिया सहज दूर करतात.

लिंबाचा रस

दोन लिंबांचा रस काढून मशीनच्या ड्रममध्ये घाला. मग कॉटनच्या कपड्याने ड्रम एकदा स्वच्छ पुसून घ्या. लिंबाच्या आम्लीय गुणधर्मामुळे घाण नाहीशी होते आणि फ्रेश सुगंधही येतो.

जुना टूथब्रश आणि टूथपेस्ट

डिटर्जंट ट्रे किंवा गॅस्केटसारख्या मशीनच्या कोपऱ्यातील अवघड भाग स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश वापरा. ब्रशला थोडी टूथपेस्ट लावून स्वच्छ केल्यास चिकट मळ सहज निघतो.

ड्रायर शीट

मशीनमधील वास काढण्यासाठी ड्रायर शीट वापरा. एक रिकामी ड्रायर शीट आत ठेवून मशीन चालवल्यास आत ताजेपणा येतो.

कपड्याने झाकून ठेवा

मशीन केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास मशीनवर नेहमी कापड झाकून ठेवा, ज्यामुळे धूळ व माती बसणार नाही. कारण हीच धूळ-माती नंतर आत जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Washing Machine Cleaning Tips for a Sparkling Clean Machine

Web Summary : Keep your washing machine clean for better performance and longevity. Use vinegar, baking soda, lemon juice, and old toothbrushes to remove dirt and bacteria. Cover your machine to prevent dust buildup and maintain freshness.
टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडी