Join us

एग्जाॅस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी हवा फक्त एक लिंबू ; 3 युक्त्या, मेणचटपणा होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2022 08:15 IST

एग्जाॅस्ट फॅनच्य स्वच्छतेकडे (cleaning of kitchen exhaust fan) दुर्लक्ष केल्यास एग्जाॅस्ट फॅन हळू फिरतात, नीट काम करत नाही, मध्येच बंद होतात. त्यासाठी एग्जाॅस्ट फॅनच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. लिंबाच्या सहाय्यानं तीन पध्दतीनं एग्जाॅस्ट फॅन (easy tricks of cleaning exhaust fan with lemon) झटपट स्वच्छ करता येतो.

ठळक मुद्देलिंबू आणि सोडा, लिंबू आणि इनो, लिंबू आणि मीठ यांच्या एकत्रित वापरानं मेणचट एग्जाॅस्ट फॅन स्वच्छ करण्याचं किचकट काम सोपं होतं. पंखा झटक्यात स्वच्छ होतो. 

स्वयंपाकघरातील मेणचट झालेला एग्जाॅस्ट फॅन (cleaning of kitchen exhaust fan)  स्वच्छ करणं अतिशय कंटाळवाणं आणि नकोसं वाटणारं काम. कितीही महगडे क्लीनर वापरले तरी त्याचा मेणचटपणा-चिकटपणा काही जात नाही. पण एग्जाॅस्ट फॅनच्य स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास एग्जाॅस्ट फॅन हळू फिरतात, नीट काम करत नाही, मध्येच बंद होतात. त्यासाठी एग्जाॅस्ट फॅनच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. लिंबाच्या सहाय्यानं तीन पध्दतीनं  (how to clean exhaust fan with lemon) एग्जाॅस्ट फॅन झटपट स्वच्छ करता येतो. 

Image: Google

1. बेकिंग सोडा आणि लिंबाच्या एकत्रित वापरानं एग्जाॅस्ट फॅन स्वच्छ करता येतो.  यासाठी एका मोठ्या  खोलगट भांड्यात गरम पाणी घ्यावं. त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा घालावा.  या पाण्यात  थोडा वेळ पंख्याच्या पात्या आणि मधला गोल बाउल घालून ठेवावा. थोड्या वेळानं पंख्याचा बाउल पाण्यातून काढून कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यावा. याच पाण्यात कपड ओला करुन त्यानं पंख्याचा आजूबाजूचा भाग पुसावा. पंख्याच्या पात्या पाण्यातून काढून त्या कापडाने स्वच्छ पुसून पंख्याला लावाव्या. पात्या न काढताही कपडा ओला करुन पात्या स्वच्छ करता येतात. 

2. पंखा खूपच मेणचट असेल तर ईनो आणि लिंबाच्या रसाचा एकत्रित वापर करावा. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्यावं. त्यात 1 चमचा इनो आणि एका लिंबाचा रस घालावा. या मिश्रणात पंख्याच्या पात्या आणि बाउल बुडवून ठेवावंं. 15 मिनिटांनी पात्या स्वच्छ झालेल्या दिसतील. 

Image: Google

3. एग्जाॅस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा एकत्रित वापर करता येतो. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा मीठ आणि लिंबाचा रस घालावा. यात गर्म पाणी घालावं. पंख्याच्या पात्या आणि बाउल या पाण्यात 10 मिनिटं बुडवून ठेवावे.  मीठ आणि लिंबाच्या सहाय्यानं एग्जाॅस्ट फॅनचा मेणचटपणा निघून जातो.  10 मिनिटांनी पंख्याचा बाउल आणि पात्या पाण्यातून काढून त्या कापडानं स्वच्छ पुसाव्यात.

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स