lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...

घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...

Easy Home Remedies For Get Rid Bed Bugs : घरात ढेकूण होऊ नयेत यासाठी जास्त दिवस कपडे न धुता ठेवू  नका. बरेच महिने बेडशीट, उशांचे कव्हर न धुतल्यामुळे ढेकूण होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 09:55 AM2023-09-01T09:55:02+5:302023-09-01T17:07:20+5:30

Easy Home Remedies For Get Rid Bed Bugs : घरात ढेकूण होऊ नयेत यासाठी जास्त दिवस कपडे न धुता ठेवू  नका. बरेच महिने बेडशीट, उशांचे कव्हर न धुतल्यामुळे ढेकूण होतात.

Easy Home Remedies For Get Rid Bed Bugs : Natural Ways to Get Rid of Bed Bugs at Home | घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...

घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...

 वातावरणातील मॉईश्चर आणि स्वच्छतेच्या अभावामुळे घरात ढेकूण तयार होता. घरात पाली, मुंग्या किंवा  झुरळं झाले तर त्यांना घालवणं सोपं असतं पण  जर घरात ढेकूण झाले असतील तर त्यांना बाहेर काढणं कठीण होतं. अशावेळी पेस्ट कंट्रोल करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. (Home remedies for bed bug removal) अंथरूणात हे किडे जास्त  दिसून येतात. यामुळे रात्री व्यवस्थित झोपही लागत नाही.

ढेकूण चावल्यामुळे अंगावर पुळ्यासुद्धा येतात. घरातील ढेकूण घालवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे  उपाय करून थकला असाल तर काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. ढेकणांना घालवण्याचे सोपे उपाय पाहूया. यामुळे ढेकूण आणि मुंग्या, अळ्यांसारखे इतर किटकही  घरापासून लांब राहतील. (Easy Home Remedies For Get Rid Bed Bugs)

1) जर तुम्हाला ढेकूण घालवायचे असतील तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. अंथरूण किंवा घरातील असा सामान जिथे ढेकूण झाले असतील ते सामान काहीवेळ उन्हात ठेवा आणि त्या ठिकाणी व्हिनेगर घाला.  तुम्ही व्हिनेगर स्प्रे बॉटलमध्ये भरूनही शिंपडू शकता. हाय टेंम्परेचर आणि व्हिनेगरच्या वासानं ढेकूण बाहेर पडतील. 

2) ढेकूणांना घालवण्यासाठी बेकींग सोडासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. अंथरूण, लाकडाचे सामान यांवर बेकींग सोडा घातल्याने ढेकूण कमी होण्यास मदत होईल.

3) कडूलिंबाची पानं आणि कडुलिंबाचे तेल ढेकूण घालवण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्या ठिकाणी ढेकूण जास्त आहेत.  तिथे कडुलिंबाची पानं ठेवा तुम्ही कडूलिंबाचा स्प्रे सुद्धा वापरू शकता. यामुळे ढेकूण बाहेर पडण्यास मदत होईल.

4) दालचिनीसुद्धा ढेकूणांना पळवण्यासाठी प्रभावी मानली जाते. दालचिनाचा उपयोग करून तुम्ही ढेकणांना कायमचं दूर ठेवू शकता. यासाठी एका भांड्यात दालचिनी, आलं, काळी मिरी आणि लवंग बारीक करून उकळत्या पाण्यात घाला. पाणी उकळून अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा.  नंतर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ढेकूण असलेल्या ठिकाणी  फवारा किंवा कापसाचा बोळा या पाण्यात बुडवून ढेकूण असलेल्या ठिकाणी ठेवा.  या उपायाने काही वेळातच ढेकूण नष्ट होतील. 

पोट सुटलंय, फिगर बेढब दिसते? २१ दिवसांत वजनात दिसेल फरक, तज्ज्ञ सांगतात 3 सोपे उपाय

5) घरात ढेकूण होऊ नयेत यासाठी जास्त दिवस कपडे न धुता ठेवू  नका. बरेच महिने बेडशीट, उशांचे कव्हर न धुतल्यामुळे ढेकूण होतात. वापरात नसलेल्या चादरी, उशांचे कव्हर स्वच्छ धुवून एका प्लास्टीकच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवा. 

Web Title: Easy Home Remedies For Get Rid Bed Bugs : Natural Ways to Get Rid of Bed Bugs at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.