श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण महिना म्हटलं की सणवार, पूजापाठ, उत्सव, व्रत - वैकल्य ओघाने आलेच. या महिन्यांत बरेचसे सणवार एकत्रित जोडून एकापाठोपाठ एक येतात. या सणवारांना(How to make dhoop sticks at home) आपण वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजाअर्चा, आरत्या करतो. पूजाअर्चा करत असताना पुजेमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे धूप. धूपाच्या सुगंधामुळे वातावरण शुद्ध होतं, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मन शांत राहतं. पूजा करताना सुगंधित धूप वापरण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे( Homemade dhoop stick recipe).
आपण शक्यतो धूप बाजारांतून विकत आणतो, परंतु या तयार धूपांमध्ये रासायनिक घटक असण्याची शक्यता असते, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. यासाठीच, नैसर्गिक व शुद्ध घरगुती धूप घरच्याघरीच स्वतः तयार करणं हे अधिक सुरक्षित आणि पवित्र मानलं जातं. घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थ वापरून धूप तयार करण्याचा अनुभव खूप खास असतो. घरगुती धूपामुळे पूजापाठ करताना घराला एक नैसर्गिक आणि पवित्र सुगंध मिळतो. या श्रावण महिन्यात येणाऱ्या सणावारांसाठी आणि घराला सुगंधित करण्यासाठी नैसर्गिक धूप कसा तयार करायचा, ते पाहूयात.
घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने धूप कसा तयार करायचा ?
घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने धूप कसा तयार करावा याची कृती kitchen_maan या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. घरगुती पद्धतीने नैसर्गिक धूप तयार करण्यासाठी आपल्याला वापरलेल्या फुलांच्या हारातील सुकलेली फुले, सुकलेल्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, नारळाची शेंडी, १० ते १२ लवंग काड्या, १५ ते २० कापूर वड्या, दालचिनीचे ४ ते ५ तुकडे, ४ ते ५ तमालपत्र, चंदन पावडर, २ टेबलस्पून साजूक तूप, गुलाब पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...
धडाम! तुमच्याही स्वयंपाकघरात कुकरचा स्फोट होण्याचा धोका आहे, ३ गोष्टी आजच तपासा...
कृती :-
सगळ्यात आधी एका मोठ्या मिक्सरच्या भांडयात वापरलेल्या फुलांच्या हारातील सुकलेली फुले, सुकलेल्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, नारळाची शेंडी, लवंग काड्या, कापूर वड्या, दालचिनीचे तुकडे, तमालपत्र असे सगळे घटक एकत्रित घालावेत. मग मिक्सर फिरवून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी.
ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बारीक पूड बारीक जाळीदार गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावी. मग यात चंदन पावडर, साजूक तूप आणि थोडे गुलाबपाणी घालून मिश्रण एकजीव करून कणकेसारखे मळून घ्यावे. तयार मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन त्याला त्रिकोणी उभट असा आकार देऊन धूप काड्या तयार करुन घ्याव्यात. तयार धूप काड्या एका ताटात ठेवून फॅनखाली २ ते ३ तास व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. घरगुती धूप वापरण्यासाठी तयार आहे.