श्रावण महिना म्हटलं की, सणावाराचा महिना. या महिन्यात विशेष करून वेगवेगळ्या प्रकारचे सण - उत्सव एकामागोमाग येतात. सणवार म्हटलं की घरात उत्साहाचं वातावरण (Easy Dhoop Sticks With Herbal Ingredients) असतं आणि सणानिमित्ताने पूजा - पाठ देखील केले जातात. श्रावणातील प्रत्येक सणाला वेगवेगळ्या देवतांच्या पूजाविधी केल्या जातात. या निमित्ताने घरात पूजेसाठी किंवा सजावटीसाठी आपण फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची (How To Make Dhoop Sticks At Home) फुलं विकत आणतो. परंतु पूजाविधी किंवा सजावट झाली की आपण ती फुलं चक्क (Natural Fragrance Dhoop Sticks) निरुपयोगी समजून फेकून देतो. या कोमेजलेला फुलांचा पुन्हा कसा वापर करायचा हे नेमकं माहित नसल्याने त्या फुलांना आपण फेकून देतो. परंतु या सुंदर फुलांना फेकून न देता त्यांचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो, तोही एक सुगंधित आणि (Homemade Dhoop Stick) पवित्र, शुद्ध धुपकांडी तयार करण्यासाठी( Natural Dhoop).
खास सणावाराला किंवा पूजेच्यावेळी धूपाचा सुगंध वातावरणाला पवित्र आणि आनंदी करतो. परंतु बहुतेकदा आपण हा धूप नेहमी बाजारातून विकत आणतो. धूप बाजारातून विकत घेण्याऐवजी आपण घरातील उरलेल्या फुलांचा वापर करून सहज तयार करू शकतो. यामुळे नैसर्गिक सुगंध मिळतो, फुलांचा पुनर्वापर होतो आणि रासायनिक धूपापेक्षा हा अधिक आरोग्यदायी व फायदेशीर ठरतो. जुनी फुले फेकून देण्याऐवजी त्यांचा असा सुंदर उपयोग केल्याने पर्यावरणालाही फायदा होतो आणि घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पूजाअर्चा - सणावारासाठी घरातच नैसर्गिक धूप तयार करणं हा या फुलांचा योग्य वापर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या घराला नैसर्गिक आणि मनमोहक सुगंध तर मिळेलच, पण सणवारासाठी घेतलेल्या फुलांचा वापरही होईल. चला तर, या सोप्या पद्धतीतून आपण टाकाऊ फुलांपासून टिकाऊ धूप कसा बनवू शकतो, ते पाहूयात...
धुपकांडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य...
घरच्याघरीच सणावारासाठी खास घरगुती धुपकांडी तयार करणे अगदी सहज सोपे आहे. यासाठी घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या व पूजेसाठी वापरलेल्या आणि कोमेजलेल्या फुलांच्या मदतीने धुपकांडी तयार करू शकता. धुपकांडी तयार करण्यासाठी वापरलेल्या फुलांच्या पाकळ्या, १ धुपकांडी, १० ते १५ कापूर वड्या, चमचाभर साजूक तूप, चंदन पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून हलके गुलाबजाम करा घरीच! ६ टिप्स-विकतचे गुलाबजाम विसरुन जाल...
वापरलेल्या फुलांचा धूप स्टिक तयार करण्याची सोपी कृती....
सगळ्यातआधी वापरलेली साठवून ठेवलेली फुले एकत्रित एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. मग, या फुलांच्या पाकळ्या काढून घ्याव्यात. सगळ्या फुलांच्या पाकळ्या एकत्रित काढून घेतल्यांनंतर, तव्यावर या पाकळ्या टाकून ३ ते ४ मिनिटे कोरड्या भाजून घ्याव्यात. आपण या फुलांच्या पाकळ्यांमधील ओलावा घालवण्यासाठी त्यांना ३ ते ४ दिवस उन्हांत देखील वाळवू शकतो.
ना रवी-ना भांडं-मिक्सरमध्ये काढा लोण्याचा गोळा! रवाळ तूप करण्याची पाहा ही भन्नाट ट्रिक...
खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...
पाकळ्या चांगल्या भाजून झाल्यावर त्या एका डिशमध्ये काढून हाताने हलकेच दाब देत त्याची बारीक पावडर करून घ्यावी. मग ही, पावडर बारीक जाळीच्या गाळणीने गाळून घ्यावी. मग गाळून घेतलेली पावडर आणि फुलांचा गाळणीत उरलेला भुसा, चंदन पावडर, कापूर पावडर, घरगुती तयार धुपाच्या एका काडीची पावडर असे सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावे. मग या तयार मिश्रणात साजूक तूप किंवा तेल घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मग या तयार मिश्रणाला धुपकांडीचा आकार द्यावा. वापरलेल्या आणि कोमेजलेल्या फुलांपासून घरगुती, नैसर्गिक धूपकांडी वापरण्यासाठी तयार आहे.