Lokmat Sakhi >Social Viral > घरात कोळ्यांची जाळी, जिथे तिथे कोळी दिसतात? पाहा ३ उपाय- पुन्हा घरात दिसणार नाहीत जळमटं

घरात कोळ्यांची जाळी, जिथे तिथे कोळी दिसतात? पाहा ३ उपाय- पुन्हा घरात दिसणार नाहीत जळमटं

Home Cleaning Tips : जर आपल्याला घरात जळमटं होऊ द्यायची नसतील आणि कोळ्यांनाही दूर ठेवायचं असेल यावर काही सोपे आणि घरगुती उपाय करू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:11 IST2025-09-22T13:54:16+5:302025-09-22T14:11:57+5:30

Home Cleaning Tips : जर आपल्याला घरात जळमटं होऊ द्यायची नसतील आणि कोळ्यांनाही दूर ठेवायचं असेल यावर काही सोपे आणि घरगुती उपाय करू शकता. 

Easy and home remedy tips to keep spider webs off house | घरात कोळ्यांची जाळी, जिथे तिथे कोळी दिसतात? पाहा ३ उपाय- पुन्हा घरात दिसणार नाहीत जळमटं

घरात कोळ्यांची जाळी, जिथे तिथे कोळी दिसतात? पाहा ३ उपाय- पुन्हा घरात दिसणार नाहीत जळमटं

Home Cleaning Tips : घराची रोज स्वच्छता करणं ही अनेकांची सवय असते. घरातील कानाकोपरा बारकाईनं साफ केला जातो. पण तरी सुद्धा अशा काही जागा असतात ज्या पूर्णपणे स्वच्छ करता येत नाहीत आणि याच ठिकाणांवर कोळी आपलं घरटं म्हणजेच जळमटं तयार करतात. आता सध्या उत्सवांचा सीझन आहे. दसरा तोंडावर आणि त्यानंतर दिवाळी सण. अशात घराची साफसफाई अनेकजण हाती घेतील. घराची साफसफाई करत असताना कानाकोपऱ्यांमधील ही जळमटच अधिक साफ करावी लागतात. एकदा जळमटं काढली तरी पुन्हा लगेच तयार होतात. अशात जर आपल्याला घरात जळमटं होऊ द्यायची नसतील आणि कोळ्यांनाही दूर ठेवायचं असेल यावर काही सोपे आणि घरगुती उपाय करू शकता. 

पहिलं काम

घराच्या भिंतींवरून जळमटं काढण्यासाठी सगळ्यात आधी तर हे बघा की, त्यात कोळी आहे की नाही. कारण जर पण जाळं काढाल तर कोळी त्यातून पळून जाईल आणि दुसरीकडे आपलं घरटं तयार करेल. त्यामुळे कोळी दिसेल तर आधी त्यांना मारणारं औषध स्प्रे करा. 

घरगुती स्प्रे

कोळी घरातून पळवून लावण्यासाठी घरीच लिंबू, पुदिना किंवा संत्र्याच्या स्प्रे तयार करू शकता. कारण या गोष्टींचा गंध कोळ्यांना अजिबात आवडत नाही. तसेच या गोष्टींमध्ये असं अ‍ॅसिड असतं जे त्यांना पळवून लावतं. त्यामुळे घरात ज्या ज्या ठिकाणी नेहमीच जळमटं तयार होतात तिथे यांचा स्प्रे मारा.

व्हिनेगर आणि दालचीनीचा स्प्रे

कोळ्यांना किंवा घरातील कीटकांना मारण्यासाठी आपण व्हिनेगर किंवा दालचीनीचा स्प्रे सुद्धा तयार करू शकतो. या दोन्ही गोष्टींचा गंधही खूप उग्र असतो. सोबतच अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडचे गुण असल्यानेही या स्प्रे ने कोळ्यांना कीटकांना मारता येऊ शकतं. 

Web Title: Easy and home remedy tips to keep spider webs off house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.