Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > काळपट-घाणेरडे स्विच बोर्ड काही मिनिटांत दिसतील नव्यासारखे, पाहा सोप्या घरगुती ट्रिक्स!

काळपट-घाणेरडे स्विच बोर्ड काही मिनिटांत दिसतील नव्यासारखे, पाहा सोप्या घरगुती ट्रिक्स!

Switch Board Cleaning Tips : घरातील मळकट झालेले इलेक्ट्रिक स्विच बोर्डही साफ करण्यासाठी आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:55 IST2025-10-13T11:25:43+5:302025-10-13T12:55:59+5:30

Switch Board Cleaning Tips : घरातील मळकट झालेले इलेक्ट्रिक स्विच बोर्डही साफ करण्यासाठी आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत.

Easy and healpfull tips to clean dirty switch board at home | काळपट-घाणेरडे स्विच बोर्ड काही मिनिटांत दिसतील नव्यासारखे, पाहा सोप्या घरगुती ट्रिक्स!

काळपट-घाणेरडे स्विच बोर्ड काही मिनिटांत दिसतील नव्यासारखे, पाहा सोप्या घरगुती ट्रिक्स!

Switch Board Cleaning Tips : सगळ्यांना आवडणारा दिव्यांचा, उत्सवाचा आणि आनंदाचा दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरांमध्ये लोक साफसफाई करू लागले आहेत. घरातील कानाकोपरा स्वच्छ व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं. धूळ, जळमटं तर असतातच, सोबतच घरातील इलेक्ट्रिक स्विच बोर्डही खूप घाणेरडे आणि मळकट झालेले असतात. जे स्वच्छ करणं डोकेदुखीचं काम असतं. पण हीच डोकेदुखी दूर करण्यासाठी आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत. जे करून स्विचबोर्ड आधीसारखे चकाचक होतील.

नेल पेंट रिमूव्हर

जर तुम्हाला स्विच बोर्ड अगदी नवीनसारखे दिसावे असे वाटत असेल, तर नेल पेंट रिमूव्हर उत्तम उपाय आहे. एका कापसाच्या बोळ्याला किंवा मऊ कापडाला नेल पेंट रिमूव्हर लावा. आता हलक्या हाताने स्विच बोर्डवर घासा. काही वेळातच बोर्डवरील काळे डाग निघून जाऊन बोर्ड स्वच्छ आणि चमकदार दिसू लागेल. फक्त काळजी घ्या की, रिमूव्हर वापरताना बोर्डचा वीजपुरवठा बंद करा.

टूथपेस्टचा उपयोग

टूथपेस्ट केवळ दातच नाही तर स्विच बोर्डही स्वच्छ करते. थोडीशी टूथपेस्ट एका कापडावर घ्या आणि बोर्डवर लावा. थोडा वेळ हलक्या हाताने घासा. मग स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसून टाका. बोर्ड लगेचच स्वच्छ आणि उजळ दिसेल.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

जर स्विच बोर्डवरचे डाग जुने आणि चिव्वट असतील, तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर एकत्र करून वापरा. दोन्ही घटक मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. टूथब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर ही पेस्ट घासा. 10–15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ करा. डाग गायब होतील आणि बोर्ड नव्यासारखा दिसेल.

हँड सॅनिटायझरचा वापर

हँड सॅनिटायझरमध्ये असलेला अल्कोहोल घाण आणि डाग काढण्यात मदत करतो. एका कापसाच्या बोळ्याला किंवा मऊ कपड्याला सॅनिटायझर लावा. बोर्डवर हलक्या हाताने घासा. काही मिनिटांतच स्विच बोर्ड स्वच्छ आणि चमकदार होईल.

काय काळजी घ्याल?

स्वच्छता करताना वीजपुरवठा बंद ठेवा.

जास्त पाणी वापरू नका, कारण त्यामुळे शॉर्टसर्किट होऊ शकते.

स्वच्छतेनंतर बोर्ड पूर्ण कोरडा झाल्यावरच वीजपुरवठा सुरू करा.

या सोप्या आणि घरगुती उपायांनी तुम्ही स्विच बोर्डवरील काळे डाग काही मिनिटांतच गायब करू शकता आणि घराच्या दिवाळी साफसफाईत एक सुंदर झळाळी आणू शकता.

Web Title : इन आसान घरेलू ट्रिक्स से मिनटों में साफ करें गंदे स्विचबोर्ड!

Web Summary : दिवाली की सफाई हुई आसान! नेल पॉलिश रिमूवर, टूथपेस्ट, बेकिंग सोडा या हैंड सैनिटाइजर का उपयोग करके स्विचबोर्ड से गंदगी हटाएं। बिजली बंद करना और फिर से चालू करने से पहले सूखापन सुनिश्चित करें। एक शानदार घर के लिए सरल उपाय!

Web Title : Clean grimy switchboards in minutes with these easy home tricks!

Web Summary : Diwali cleaning made easy! Remove dirt from switchboards using nail polish remover, toothpaste, baking soda, or hand sanitizer. Always turn off power and ensure dryness before resuming electricity. Simple tricks for a sparkling home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.