Dussehra 2025: आपल्या भारतात प्रत्येक सण- उत्सवांची एक वेगळी परंपरा आहे. त्यातील विशेष:म्हणजे दसरा.दसरा हा सण विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.(Dussehra Special) या दिवशी घर सजवण्याची, एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची परंपरा मागच्या ही अनेक वर्षांपासून सुरु आहे.( Mango leaves decoration) पण यादिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्याची परंपरा आहे.(Toran making at home) घराच्या दाराला किंवा देव्हाऱ्यावर आंब्याची पानं बांधलेलं तोरणं हे फक्त सजावटीसाठी नसते तर त्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.(Dussehra toran ideas) हल्ली बाजारात रेडीमेड तोरणं सहज मिळतात, पण हाताने तयार केलेले तोरण हे अधिक मंगलकारी मानलं जातं.(Mango leaves for pooja) सध्या बाजारात प्लास्टिक, कागदाचे तोरण पाहायला मिळते. जर आपल्यालाही घरच्याघरी आंब्याच्या पानांचे तोरण बनवायचे असेल तर या स्टेप्स फॉलो करा. (Mango leaf garland)
पूजेतील झेंडूची फुलं- पाने कचऱ्यात न टाकता करा 'असा' उपयोग – धूपाचा सुवास दरवळेल घरभर!
आंब्याच्या पानांचे तोरण बनवण्यासाठी आपल्याला झेंडूची फुले, आंब्याची पाने, कात्री आणि सुई, धाग्याची आवश्यकता लागेल. सगळ्यात आधी आपल्याला आंब्याच्या पानांची मधली शिर दोन्ही बाजूने कात्रीच्या मदतीने अर्धी कापावी लागेल. आता त्याची मधली डहाळी आपल्याला दिसेल. डहाळीच्या वरची शेंडी कात्रीने कापा. यानंतर उजव्या भागाचे पान डाहाळीच्या मदतीने मोडून घ्या. दुसऱ्या बाजूने देखील सारखी पद्धत करा. मधल्या खाचेतून पान बाहेर काढा. ज्यामुळे आंब्याच्या पानांचे पॉकेट तयार होईल.
आता आपल्याला आंब्याची डहाळी दुमडून खाच्यामध्ये घालावी लागेल. पॉकेटमध्ये झेंडूचे फूल ठेवून व्यवस्थित स्टॅपलरच्या मदतीने सेट करा. सर्व झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे पॉकेट तयार करुन घ्या. आता सुईतच्या दोरा भरुन त्याला गाठ बांधा. झेंडूची तीन फुले दोऱ्यात ओवून घ्या. त्यानंतर फुलांचे पॉकेट ओवा. पुन्हा झेंडूची तीन फुले ओवा. या पद्धतीने संपूर्ण तोरण व्यवस्थित ओवून घ्या. तयार होईल आंब्याच्या पानांच सुरेख तोरण घरच्या घरी.
Web Summary : Make a mango leaf toran at home this Dussehra. Follow these simple steps using mango leaves and marigolds for a festive decoration.
Web Summary : इस दशहरे पर घर पर आम के पत्तों का तोरण बनाएं। त्योहार की सजावट के लिए आम के पत्तों और गेंदे के फूलों का उपयोग करके इन सरल चरणों का पालन करें।