Join us

पावसाळ्यात तुमच्याही डॉगीच्या अंगाचा कुबट वास येतो? दुर्गंधी कमी करण्यासाठी ५ सोपे उपााय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:16 IST

How To Remove Odor From Pet: पावसाळ्याच्या दिवसांत पाळीव कुत्र्यांची, मांजरांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. त्यांच्या अंगाची दुर्गंधी येऊ नये यासाठी हे काही खास उपाय..

ठळक मुद्देडॉगीच्या अंगाचा किंवा पाळीव मांजराच्या अंगाचा कुबट, घाण वास येत असेल तर तो दूर करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.

पावसाळ्याला सुरुवात झाली की सगळीकडे ओलसरपणा दिसून येतो. घराबाहेर सगळीकडे पाणी, माती, चिखल अशी कचकच असते. तर घराच्या आत भींतींनाही ओल येते. कपाटांमधून, बेडच्या बॉक्समधून कुबट वास येतो. कपड्यांनाही वास येतो. तसाच काहीसा वास घरातल्या पाळीव प्राण्यांच्या अंगातूनही येऊ लागतो. पाळीव प्राण्यांची आपण व्यवस्थित स्वच्छता ठेवतो, पण तरीही पावसाळ्याचे काही दिवस त्यांच्या अंगातून कधी कधी एवढी दुर्गंधी येते की ती सहन करणंही नकोसं होऊन जातं (How To Remove Odor From Pet?). तुमच्याही डॉगीच्या अंगाचा किंवा पाळीव मांजराच्या अंगाचा असा कुबट, घाण वास येत असेल तर तो दूर करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.(how to get rid of odour, bad smell from dog and other pet animals?)

 

पावसाळ्यात पाळीव प्राण्यांच्या अंगाचा दुर्गंध येत असल्यास काय उपाय करावे?

१. डॉगीच्या अंगाची दुर्गंधी घालवायची असेल तर त्याला नियमितपणे आंघोळ घालणं खूप गरजेचं आहे. यासाठी चांगल्या दर्जाचे शाम्पू वापरा. तसेच अंग धुण्यासाठी कोमट पाणी वापरा आणि आंघोळीनंतर त्याचे केस व्यवस्थित कोरडे करा. केस ओले राहिल्यास दुर्गंधी वाढते.

वाळून गेलेल्या रोपालाही ८ दिवसांतच फुटतील नवी पानं! द्या रोपांना हिरवंगार करणारं 'हे' खास टॉनिक

२. कुत्र्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे ॲपल साईड व्हिनेगर घाला आणि त्यापाण्याने त्याचे अंग स्वच्छ धुवा. त्यामुळेही अंगाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

 

३. तुमचा डॉगी जिथे बसतो ती जागा, त्याचे अंथरुण, पांघरुण व्यवस्थित स्वच्छ आहे की नाही ते तपासा. पावसाळ्याच्या दिवसांत त्याचे कपडे नियमितपणे धुवा आणि जेव्हा कडक ऊन पडेल तेव्हा तेव्हा उन्हात वाळू घाला. कपड्यांची दुर्गंधी कमी झाली की आपोआपच डॉगीच्या अंगाचा कुबट वासही जाईल. 

रोहित शर्माच्या लेकीलाही Labubu टॉयचा नाद! लक्झरी टॉय म्हणून ओळखली जाणारी ही कोणती बाहुली?

४. बेकिंग सोडा आणि कॉर्न स्टार्च एकत्र करा. हे मिश्रण डॉगीच्या अंगावर टाका आणि त्याच्या ब्रशने त्याचे केस विंचरा. अशा पद्धतीने ड्राय आंघाेळ घालूनही त्याच्या अंगाचा दुर्गंध घालवता येईल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकुत्रासुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्स