Join us

सुटी हवी म्हणून कुणी आई मरणार आहे, असं सांगतं का? पाहा हा रजेचा अर्ज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 14:25 IST

Social Viral Letter सुटी हवी म्हणून कुणी आपली आई मरणार आहे असं कारण रजेच्या अर्जात लिहू शकतं का?

कामाच्या व्यापात थोडा आराम मिळणे खूप महत्त्वाचे आहे. जॉब लाईफस्टाईलमधून शरीराला थोडी विश्रांती हवीच. जर लाँग सुट्टी हवी असेल, अथवा कुठे बाहेर जायचं असेल तर आपण अनेक दिवसांची सुट्टी टाकतो. कामाच्या ठिकाणी आपल्याला आधीच सुट्टीचा अर्ज द्यावा लागतो. काही प्रसंग अचानक घडतात जसे की आपण आजारी पडतो, किंवा कोणाचा मृत्यू होतो. तेव्हा आपल्याला अचानक सुट्टी घ्यावी लागते. मात्र आता असाच एक सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अर्ज एका शिक्षकाने लिहिला आहे. विशेष म्हणजे त्याने सुट्टीच्या अर्जामध्ये चक्क आपल्या आईचा मृत्यू होणार असल्याची भविष्यवाणी केलीय. सध्या हा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या अर्जात शिक्षकाने लिहिले की, " ५ डिसेंबर सोमवारी रात्री ५ वाजल्याच्या जवळपास माझ्या आईचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी ६ आणि ७ डिसेंबर रोजी मला सुट्टी हवी आहे. कृपया माझा अर्ज स्वीकारा"सुट्टीसाठी जिवंत आईच्या मरणाची भविष्यवाणी करणे, हे खूप धक्कादायक आहे. या शिक्षकाने असं का केलं असावं? हा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या या व्हायरल अर्जावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, तुफान व्हायरल झाला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया