Join us

भयंकरच! तरुणीच्या पोटातून काढला २ किलो केसांचा गोळा, ती रोज केस खायची कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2024 18:20 IST

doctors found two kilo hair bunch in women stomach during operation in barely : पोटात हे खाल्लेले केस वर्षानुवर्षे साठून राहीले होते, ज्यामुळे तिचे पोट दुखत होते.

कोणाला काय सवय असेल सांगता येत नाही. अनेकांना नखं खाण्याची सवय असते तर कोणाला आणखी काही. आपली ही सवय आरोग्यासाठी घातक असेल तर घरातील मंडळी आपल्याला ती सवय मोडण्यासाठी ओरडत राहतात. अशावेळी त्यांचे ऐकले तर ठिक नाहीतर ही सवय महागात पडू शकते. नखं खाणं, केसांशी खेळणं, नाक चोळत राहणं अशा सवयी एकवेळ ठिक आहेत पण उत्तर प्रदेशमधील एका तरुणीला चक्क स्वत:चेच केस खाण्याची सवय होती (doctors found two kilo hair bunch in women stomach during operation in barely). 

बरेली येथे राहणारी ही २१ वर्षीय तरुणी पोट दुखत असल्याची तक्रार घेऊन जिल्हा रुग्णालयात आली. ती बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त होती. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी तिची शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. पोटात काही असल्याने शस्त्रक्रिया करुन बाहेर काढावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. पण प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दुसरे तिसरे काही नाही तर केसांचा गोळा बाहेर निघाला. हा गोळा थोडाथोडका नाही तर तब्बल २ किलोचा होता. या मुलीला केस खाण्याची सवय असल्याने तिच्या पोटात हे खाल्लेले केस वर्षानुवर्षे साठून राहीले होते, ज्यामुळे तिचे पोट दुखत होते. 

तिला ट्रायको फोटोमेनिया नावाचा मानसिक आजार असल्याचे समोर आले. या आजारामुळे ही तरुणी वयाच्या १६ वर्षापासून स्वत:चेच केस खात होती. याआधीही अशाप्रकारच्या घटना समोर आल्या असून महिलांच्या पोटातून केसांचे गुंते शस्त्रक्रिया करुन काढण्यात आले आहेत. मात्र आताचे केसांचे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्टरांचेही म्हणणे आहे. अशाप्रकारे कोणत्याही आजारामुळे किंवा सवयीमुळे केस खाणे आरोग्यासाठी किती घातक असू शकते हेच यातून दिसून येते. सदर तरुणीला काही वर्षांपूर्वीही पोटदुखीचा त्रास झाला होता. त्यावेळी लाखो रुपये खर्च करुन उपचार करण्यात आले मात्र त्या उपचारांचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया