पूर्वीच्या काळी आपल्या आज्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे गोंदण (Do you know what Kangana Ranaut's back tattoo symbolizes) काढून घ्यायच्या. त्यामुळे अंगावर गोंदवून घेण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासूनच आहे. जसजसा काळ बदलत गेला तसेच अंगावर गोंदवून घेण्याच्या याच पारंपरिक पद्धतीला 'टॅटू काढणे' या सो कॉल्ड (Kangana Ranaut Tattoo) नावाने ओळखले जाऊ लागले. आजकाल अंगावर टॅटू काढून घेणे ही एक हटके, ट्रेंडिंग फॅशनच झाली आहे. जो - तो आपल्या आवडीनुसार टॅटू काढून घेतात(Kangana Ranaut describes how she made her tattoo 'come alive').
अंगावर असा कोणत्याही प्रकारचा टॅटू काढून घेण्यामागे अनेकांचे वेगवेगळे उद्देश असतात. कुणी फॅशन म्हणून, तर कुणी आठवण म्हणून तर कुणी सहज आवडलं म्हणून अशा अनेक कारणांसाठी अंगावर टॅटू काढून घेतात. अंगावर टॅटू काढून घेण्याचे हे फॅड इतके वाढले आहे की, तरुणाईपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण ही टॅटूची ट्रेंडिंग फॅशन मोठ्या आवडीने मिरवत (Kangana Ranaut reveals interesting trivia about the tattoo on the nape of her neck) आहे. अंगावर टॅटू काढून घेणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या यादीत कंगना राणावतचे देखील नाव येते. कंगनाने देखील मोठ्या आवडीने आपल्या मानेवर एक सुंदरसा असा टॅटू काढून घेतला आहे. तिच्या या टॅटूचा नेमका अर्थ काय? तिने तो टॅटू का काढून घेतला अशा अनेक गोष्टीबद्दलची अधिक माहिती तिने स्वतः ट्विटरवर शेअर केली आहे.
कंगनाचे टॅटू प्रेम...
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये तिच्या मानेवर असलेल्या सुंदर टॅटूचा फोटो शेअर केलाय. हा फोटो तिच्या टॅटूाचा क्लोजअप फोटो आहे. जो फारच सुंदर दिसतो आहे. कंगनाने हा टॅटू साधारण २ दशकांआधी म्हणजे २० वर्षांआधी काढून घेतला होता. पण वेळोवेळी तिने या टॅटूच्या डिझाइनमध्ये बदल केले. आता या टॅटूला फानयल लूक मिळाला आहे.
कंगनाने ट्विटरवर तिच्या आकर्षक टॅटूची एक विशेष गोष्ट शेअर केली आहे. कंगनाने लिहिले की 'एक दशकपेक्षाही आधी मी माझ्या मानेच्या बरोबर खाली विंग्स बनवले होते. पण त्याचा काही अर्थ निघाला नाही. मग काही महिन्यांनतर मी यात एक क्राउन तयार करून घेतला. पण तरी सुद्धा यात काहीतरी कमतरता होती. त्यानंतर मी या टॅटूच्या मधे तलवार काढून घेतली आणि अचानक यात जीव आला. चमक नेहमी वेदनेनंतरच येते'.
चेहरा धुण्यासाठी केमिकल्सयुक्त फेसवॉशपेक्षा वापरा 'हे' ६ पदार्थ, त्वचेला मिळतील अनेक फायदे...
More than a decade ago I got two wings on the nape of my neck but they didn’t make any sense, after few months I added a crown, still it wasn’t enough, then I pierced it all with a sword suddenly my tattoo came alive, glory comes only after the pain. pic.twitter.com/Wk4FS9KIcZ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 31, 2020
कंगना राणावतने काढलेल्या टॅटूचा खरा अर्थ...
कंगना राणावतने तिच्या मानेवर पाठीमागे एक छोटासा टॅटू काढला आहे. तिच्या मानेवरील टॅटू हा तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींचे प्रतीक आहे. तिच्या टॅटूमध्ये एक छोटासा क्राऊन आहे, क्राऊन म्हणजेच राणीचा मुकुट. ती स्वतःला राजकुमारी समजते यासाठी तिने तुच्या टॅटूमध्ये राणीचा मुकुट काढला आहे. त्यानंतर विंग्स म्हणजेच पंख तिच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून तिने काढले आहेत. याचबरोबर, तिच्या टॅटूमधील तलवार तिचा चित्रपटसृष्टीत स्वत: ला प्रस्थापित करण्यासाठीच्या संघर्षाचे प्रतीक आहे.