स्वयंपाकासाठी रोजच्या रोज गॅस सिलेंडरचा वापर होतोच. ज्या घरात जास्त लोकं असतात त्या घरातला सिलेंडर अगदी महिना- दिड महिन्यातच संपून जातो. हिवाळा आणि पावसाळा या दिवसांमध्ये तर सिलेंडर जास्त लागतो. महागाईमुळे सिलेंडरचे भावही खूप वाढलेले आहेत. एका सिलेंडरसाठी जवळपास १ हजार रुपये मोजावे लागतात. हातावर पोट असणाऱ्या लोकांना महिन्याला एवढा खर्च करणं जिवावर येतं. त्यामुळेच मग सिलेंडर जास्तीतजास्त दिवस जावं यासाठी कित्येक लोक काही वेगवेगळे प्रयोग करतात. पण तुमचे हे प्रयोग तुमच्याच जिवावर बेतू शकतात. अशीच एक घटना नुकतीच मुंबईतील कांदिवली येथे घडली.
या घटनेवरून अनेकांनी सावध होणं गरजेचं आहे. हा स्फोट ज्या घरात झाला त्या लोकांनी सिलेंडर जास्तीतजास्त दिवस चालावा म्हणून तो चक्क पाण्यामध्ये उलटा टाकून ठेवलेला होता. त्यामुळे त्याच्यातून गॅस गळती होऊ लागली.
आरशात पाहिलं की डोक्यावरचे पांढरे केसच जास्त दिसतात? ३ उपाय, केस होतील काळेभोर
वातावरणात गॅस साचून राहिला आणि मग एकदम त्याचा भडका होऊन स्फोट झाला. मोजके काही पैसे वाचविण्यासाठी त्या लोकांनी त्यांचा लाखमोलाचा जीव धोक्यात घातला. म्हणूनच मनानेच किंवा वरवरची माहिती घेऊन असे प्रयोग करणं पुर्णपणे टाळायला हवं.
सिलेंडर आता संपत आलेला आहे, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा बऱ्याच घरांमध्ये ते थोडंसं तिरकं करून ठेवलं जातं. किंवा काही काही घरांमध्ये तर ते जमिनीवर आडवं पाडलं जातं.
वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना कैफ होतेय आई! चाळिशीनंतरचं बाळंतपण खरंच सोपं असतं का?
यामुळे सिलेंडरला लावलेली नळी सैल होऊ शकते आणि तिच्यातून गॅस गळती होऊ शकते. वातावरणात हा गॅस पसरणं अतिशय धोकादायक असून त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणूनच वेळीच सावध व्हा. या बाबतीत गृहिणींनीच ठाम भुमिका घेऊन असे कोणतेही प्रयोग आपल्या घरात होणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी.