Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात गाडीत चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; छोट्याशा चुकीमुळेही लागू शकते आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 09:40 IST

Do Not Leave 5 Things in Your Car in Summer Season: सध्या उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे काही वस्तू तुमच्या कारमध्ये ठेवणे अतिशय धोकादायक ठरू शकते.(5 things in your car may catch fire)

वैशाख वणवा आता सुरू झाला आहे. वैशाखातले दिवस म्हणजे अतिशय उष्णता. त्यामुळेच तर सध्या सगळीकडेच उन्हाचा कडाका वाढला आहे. काही ठिकाणी तर तापमान ४० डिग्रीपेक्षाही पुढे गेले आहे. अशा कडक उन्हात जर तुमची गाडी तापत असेल तर तिच्यामध्ये ठेवलेले काही पदार्थ किंवा वस्तू अतिशय धोकादायक ठरू शकतात. उष्णता पकडून त्यांना आगही लागू शकते (Do Not Leave 5 Things in Your Car in Summer Season). त्यामुळे या दिवसात थोडी खबरदारी घेतलीच बरी.(5 things in your car may catch fire)

उन्हाळ्यात गाडीत चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू 

 

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सिगरेट लाईटर. स्मोकिंगची सवय असणाऱ्या कित्येकांना गाडीत सिगरेट लायटर ठेवण्याची सवय असते. पण उन्हाळ्यात ही सवय खूप जास्त हानिकारक ठरू शकते. त्यामुळे गाडीमध्ये चुकूनही लायटर विसरू नका.

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

२. परफ्यूम किंवा बॉडी स्प्रे, डिओ असे पदार्थही रणरणत्या उन्हाने तापलेल्या गाडीत ठेवणे अतिशय धोकादायक आहे. त्यामध्ये असणारे केमिकल्स कधीही पेट घेऊ शकतात.

 

३. कोरोनानंतर सॅनिटायझरचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे अजूनही कित्येकांच्या कारमध्ये किंवा पर्समध्ये हॅन्ड सॅनिटायझर असते. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अल्कोहोल असते. त्यामुळे उन्हाळ्यात ते गाडीत ठेवणे धोकादायकच आहे.

लिव्हर खराब होत चाललंय हे सांगणारी ४ लक्षणं, सावध व्हा- फॅटी लिव्हर, कोलेस्टेरॉलचा धोका

४. जर तुम्ही चष्मा गाडीच्या डॅशबोर्ड वर ठेवला तर तो उष्णता शोषून घेतो आणि लवकर तापतो. चष्म्याची काच किंवा फ्रेम तापल्यावर डॅशबोर्डही गरम होऊ शकतो. हे गाडीसाठी धोकादायकच आहे.

५. मोबाईल, लॅपटॉप, पॉवर बँक अशा वस्तूही कडक उन्हात कारमध्ये ठेवणे टाळा. कारण अतिउष्णतेमुळे त्यातली बॅटरी फुटून स्फोट होण्याची शक्यता असते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these items in a hot car; fire risk!

Web Summary : Summer heat can make certain car items dangerous. Cigarette lighters, perfumes, sanitizers, glasses, and electronics may ignite or explode. Take precautions to avoid fire risks.
टॅग्स :समर स्पेशलकार