Join us

सोन्याचांदीच्या जुन्या दागिन्यांना घरीच ‘अशी’ करा पॉलिश, ३ उपाय-दागिने उजळतील नव्यासारखे लख्ख..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 16:16 IST

How to Polish Gold and Silver Jewellery At Home: दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचांदीच्या दागिन्यांना छान चमकवायचं असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा..(home hacks to clean gold and silver jewellery)

दिवाळी हा वर्षाचा मोठा सण. त्यामुळे सगळेजण अगदी उत्साहात या सणाची तयारी करतात. या सणाच्या आधी काही दिवस घरातला सगळा कचरा काढून घर अगदी स्वच्छ, लख्खं केलं जातं. त्यानंतर सगळी खरेदी अगदी उत्साहात पार पडते. फराळाची तयारीही होते आणि त्यासोबतच साडी, कपडे, दागिने अशी तयारीही सुरूच असते. आता दिवाळीसाठी अनेकजणी त्यांचे सोन्याचांदीचेदागिने घालतात आणि नटूनथटून छान तयार होतात. अस्सल साेन्याचांदीचे दागिने असले तरी त्यांची चमक हळूहळू कमी होतेच कारण त्यांच्यावर घाण जमा होते. ती काढून दागिने अगदी पॉलिश केल्याप्रमाणे लख्खं चमकवायचे असतील तर घरच्याघरी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..(home hacks to clean gold and silver jewellery)

सोन्याचांदीच्या दागिन्यांना घरच्याघरी पॉलिश कशी करावी?

 

१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे दोन्ही पदार्थ तुमचे सोन्याचांदीचे दागिने अगदी चकाकून टाकतील. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर दागिने गरम पाण्यामध्ये १० ते १२ मिनिटे भिजू द्या.

Diwali 2025: पणत्या जास्त तेल शोषतात? ३ टिप्स- पणत्यांमधून तेल झिरपून वाया जाणार नाही

त्यानंतर एका वाटीमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घ्या. आता हे मिश्रण दागिन्यांवर लावा आणि टुथब्रशने दागिने घासून काढा. ते अगदी छान चमकतील.

 

२. टुथपेस्ट

चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टुथपेस्ट किंवा मग टुथ पावडर या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम आहेत.

काजागी तासंतास बसून काम करण्याची सवय सिगरेट इतकीच घातक! म्हणूनच ५ टिप्स- आजारपण टळेल

दागिने गरम पाण्यात भिजत ठेवल्यानंतर टुथब्रशवर टुथपेस्ट किंवा पावडर लावा आणि त्याने दागिने घासून काढा. अगदी २ ते ३ मिनिटांतच दागिने चमकायला लागतील.

 

३. ॲल्युमिनियम फॉईल

चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचाही खूप चांगला वापर करता येतो. यासाठी एक भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल पसरवून टाका.

दिवाळीसाठी अंबाडा हेअरस्टाईलचे ७ प्रकार- पारंपरिकता आणि स्टाईल दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन

त्यावर चांदीचे दागिने ठेवा आणि मग त्यावर गरम पाणी टाका. या पाण्यात थोडा बेकिंग सोडा घाला. पाणी थंड झाल्यानंतर दागिने त्यातून बाहेर काढा आणि मग टुथब्रशने घासून घ्या. छान चमकतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Polish gold, silver jewelry at home with these three simple methods.

Web Summary : Clean gold and silver jewelry at home using baking soda, vinegar, toothpaste, or aluminum foil. These methods remove dirt, restoring shine effortlessly.
टॅग्स :दिवाळी २०२५स्वच्छता टिप्सदागिनेसोनंचांदी