Join us  

फक्त कपडे धुण्यासाठी डिटर्जेंट वापरता? घरातल्या 'या' कामांसाठी डिटर्जेंट वापरा, झटपट घर होईल स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 1:07 PM

Different Uses Of Detergent Powder : एक ते दोन चमचे डिटर्जेंट पावडरच्या मदतीने तुम्ही बागेतील झाडांवरचे कोणतेही कीटक सहजपणे दूर करू शकता. तीव्र वास आणि आंबटपणामुळे, कीटकांना काही मिनिटांत दूर जाऊ शकते.

डिटर्जेंट पावडर प्रत्येक घरात कपड्यांच्या साफसफाईसाठी वापरला जातो. कपडे स्वच्छ करण्याव्यतिरिक्त घरातल्या इतर अनेक कामांसाठी डिटर्जेंटचा वापर केला जातो. फक्त स्वच्छताच नाही तर घरातील किटक दूर पळवण्यासाठीही डिटर्जेंट फायदेशीर ठरू शकतो. (Different uses of detergent powder) या लेखात तुम्हाला डिटर्जेंटची वापरण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. (What are the Advantages of Using Detergent Powder)

 किटक दूर ठेवता येतात

एक ते दोन चमचे डिटर्जेंट पावडरच्या मदतीने तुम्ही बागेतील झाडांवरचे कोणतेही कीटक सहजपणे दूर करू शकता. तीव्र वास आणि आंबटपणामुळे, कीटकांना काही मिनिटांत झाडापासून दूर जाऊ शकते. याशिवाय, तुम्ही याचा वापर मोसमी कीटकांना दूर करण्यासाठी देखील करू शकता. यासाठी आधी डिटर्जेंट पावडर आणि इतर काही गोष्टींच्या मदतीने फवारणी करावी लागेल. (Different ways to use washing powder around your home)

स्प्रे बनवण्याचे साहित्य

डिटर्जेंट पावडर - 2 टीस्पून, बेकिंग सोडा - 1 टीस्पून,पाणी - 2 लिटर, स्प्रे बाटली-१

सर्व प्रथम, डिटर्जेंट पावडर पाण्यात मिसळा. डिटर्जंट पावडरमध्ये  बेकिंग सोडा टाका आणि एकत्र करा. आता एका स्प्रे बाटलीत भरून काही वेळ राहू द्या. तयार लिक्विडची झाडावर चांगली फवारावी. फवारणी केल्यानंतर तुम्हाला दिसेल की कीटक दूर जात आहेत. याशिवाय या स्प्रेचा वापर बाथरूम, स्वयंपाकघर, दुकान इत्यादी ठिकाणांहून सहज कीटक दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. किचन सिंकमध्ये चुकूनही फेकू नका ५ गोष्टी; पाईप ब्लॉक होऊन पाणी कधी तुंबेल कळणारही नाही

फरशीची साफसफाई

तुम्ही डिटर्जेंट पावडरने  फरशी देखील चांगली स्वच्छ करू शकता. यासाठी चार ते पाच लिटर पाण्यात दोन ते तीन चमचे डिटर्जेंट पावडर टाकून द्रावण तयार करा आणि जमिनीवर टाकून थोडा वेळ सोडा. काही वेळाने क्लिनिंग ब्रशने फरशी स्वच्छ करा. याशिवाय तुम्ही या मिश्रणाने टॉयलेटही स्वच्छ करू शकता. नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल