Lokmat Sakhi >Social Viral > तुम्हाला माहिती आहे का पाळीव प्राणीही बोलतात? तुम्हाला कळते का त्यांची भाषा, वाचा ते काय सांगतात..

तुम्हाला माहिती आहे का पाळीव प्राणीही बोलतात? तुम्हाला कळते का त्यांची भाषा, वाचा ते काय सांगतात..

Did you know that pets can talk? read what they say.. : प्राण्याशी संवाद साधा. बघा त्यांना तुम्ही आवडता नाही. तेच सांगतील जाणून घ्या कसे.

By चैताली मेहेंदळे | Updated: February 12, 2025 19:41 IST2025-02-12T19:39:19+5:302025-02-12T19:41:21+5:30

Did you know that pets can talk? read what they say.. : प्राण्याशी संवाद साधा. बघा त्यांना तुम्ही आवडता नाही. तेच सांगतील जाणून घ्या कसे.

Did you know that pets can talk? read what they say.. | तुम्हाला माहिती आहे का पाळीव प्राणीही बोलतात? तुम्हाला कळते का त्यांची भाषा, वाचा ते काय सांगतात..

तुम्हाला माहिती आहे का पाळीव प्राणीही बोलतात? तुम्हाला कळते का त्यांची भाषा, वाचा ते काय सांगतात..

माणसांपेक्षा प्राणी प्रेमळ असतात. असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. तुम्ही घरी पाळलेले प्राणी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. (Did you know that pets can talk? read what they say..)त्यांना बोलता येत नाही आणि त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. मग त्यांचं प्रेम कळणार कसं? प्राणी सांकेतिक भाषेचा वापर करतात. त्यांनाही आपल्यासारख्याच भावना असतात. वेळोवेळी ते आपल्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला ते कळत नाही. तुमच्या पाळीव प्राण्याचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही ते जाणून घ्या. (Did you know that pets can talk? read what they say..)या काही सांकेतिक कृतींच्या मदतीने ते जाणून घेणे सहज शक्य होईल. मांजर असो, कुत्रा असो वा अन्य पाळीव प्राणी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांचे प्रेम दाखवतच असतात. 

१. तुमच्या घरात जर मांजर आहे तर, ती अशा काही कृती करेल की तुमचे लक्ष वेधले जाईल. (Did you know that pets can talk? read what they say..)तिचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याला ती चाटेल. मांजर सहसा सगळ्यांच्याच जवळ जात नाही. पाळीव मांजर फक्त आवडत्या लोकांना जवळ करते. ती सतत पायापाशी रेंगाळत राहील. तिचे अंग तुम्हाला घासेल. मांडीत येऊन बसेल. तुम्ही दिसल्यावर पळत येईल. तुमचा आवाजही तिला ओळखता येतो.

२. कुत्रे फारच प्रेमळ असतात. अर्थात वेगवेगळ्या प्रजातींच्या कुत्र्यांचा स्वभावही वेगवेगळा असतो. मात्र मालकावर त्यांचा प्रचंड जीव असतो. कुत्र्‍याला 'वफादार' म्हटले जाते. कारण एकदा एखाद्यावर जीव लावला की, तो विसरत नाही. कुत्रा तुमच्या अवतीभोवती शेपटी हलवत फिरेल. उड्या मारेल. सतत मान वाकडी करून बघेल. याचा अर्थ त्याला तुम्ही आवडता. तुमच्या पाळलेल्या कुत्र्याला तुमच्याबरोबर खेळायला आवडेल.      

 ३. तुमचे पाळीव प्राणी सतत तुमच्या मागे-मागे फिरत असतील तर, त्यांना तुमच्या सहवासाची आवड आहे. बराच वेळानंतर तुम्ही दिसल्यावर त्यांना प्रचंड आनंद होतो. ते धावत तुमच्या जवळ येतात. याचा अर्थ त्यांना तुमची खुप आठवण आली.

४. प्राण्यांना तुमच्या कुशीत येऊन झोपायला आवडते. त्यांना तुमची मिठी फार सुरक्षित वाटते. ते सतत तुम्हाला चिकटून बसतात. याचा अर्थ त्यांचा तुमच्यावर खुप विश्वास आहे.

५. तुमच्याकडे बघताना त्यांच्या डोळ्यांचे हावभाव बदलत राहतात. त्यांच्या डोळ्यात कौतुक, उत्सुकता, आनंद दिसतो. तुम्ही काय करता याचं ते निरिक्षण करत असतात. तुमचा त्यांना लळा असला तरच ते असं बघतात. त्यांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम असल्याचा 'शेपटी हलवणे' हा सगळ्यात मोठा संकेत आहे. प्राण्यांमध्येही आपल्याप्रमाणेच उत्सुकता असते. त्याची जेवढी काळजी घ्याल, तेवढा तुमचा त्यांना लळा जास्त लागेल.  

Web Title: Did you know that pets can talk? read what they say..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.