Join us  

कमालच केली! जीन्स घालूनच चालणार सप्तपदी; लग्नासाठी मुलीची अनोखी अट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 6:49 PM

Desi dulhan wants to take her pheras in denims व्हिडिओला जवळपास 7 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या.

सोशल मीडियावर लग्नकार्यातील वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी नाईट सूटवर सात फेरे घेणार असं म्हणणारी  नवरी तुफान चर्चेत आली. आता आणखी एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिनं जिन्स घालूनच सप्तपदी घेणार असल्याचं सांगितलं. इंस्टाग्रामवर Witty Wedding या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या वधूचं नाव मुद्रा भगत असल्याचं सांगितलं जात आहे.  (Desi dulhan wants to take her pheras in denims)

आता व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, मुद्रा तिच्या लग्नाच्या सर्व कपड्यांमध्ये दिसली परंतु लेहेंग्याऐवजी, तिने बॉयफ्रेंड जीन्स घातली होती. नातेवाईक तिला पेहरावासाठी घेऊन जाण्याची वाट पाहत असताना ती म्हणाली, “मेरेको लेहेंगा नहीं देखना, मुझे ऐसे ही जाना है (मला लेहेंगा घालायचा नाही, मला असेच जायचे आहे).”

ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला जवळपास 7 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या. “हे तुमचं लग्न आहे...तुम्हाला आवडेल तसं करू शकता,” असं एक वापरकर्ता म्हणाला.

तर आणखी एका युजरनं, 'आपल्या पंरपरांना का खराब करताय, असं तर अमेरिकेत पण नाही करत. ते लोक सुद्धा आपला वेडींग गाऊन घालतात. आपल्या परंपरांचे पालन करतात.  अशा शब्दात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.' 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया