Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् वडिलांचा थकवाच गेला; कामाहून दमून आलेल्या बापाचं लेकीनं असं केलं स्वागत, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:34 IST

Daughters Dance With Father Who Were Come From Office : सोशल मीडियावर असाच एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोकही भावूक झाले आहेत.

अनेकदा सोशल मीडियावर (Social  Media) असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सत्य घटनांवर आधारीत हृदयस्पर्शी व्हिडिओ बऱ्याचवेळा व्हायरल होतात. कामावरून थकून घरी आल्यानंतर असा नजारा पाहायला मिळाला तर कामाचा सर्व ताण निघून जाईल. सोशल मीडियावर असाच एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोकही भावूक झाले आहेत. (Daughters Dance With Father Who Were Come From Office Emotional Video Goes Viral)

या व्हिडिओमध्ये वडील आणि त्यांच्या दोन मुलींच्या नात्यातील सौंदर्य दिसून येत आहे. हा व्हिडिओ वारंवार लोक पाहत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील ऑफिसचं काम संपवून घरी आले आहेत.  त्यांच्या हातात ऑफिसची बॅग असते आणि चेहऱ्यावर थकवा दिसून येतो.

घराचा दरवाजा उघडताच त्यांच्या दोन्ही मुली दरवाजा उघडून उभ्या असतात. दरवाजा उघडताच अचानक गाणी वाजू लागतात. 'आपके आ जाने से'... हे गाणं सुरू असतं. गाणं ऐकताच वडील आश्चर्यचकीत होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर मोठं हास्य येतं.

दिवसभराचा थकवा काही क्षणात दूर झाला

त्यानंतर दोन्ही मुली आपल्या वडीलांसाठी डान्स करणं सुरू करतात.  या डान्समधून त्यांचा निरागसपणा, आनंद आणि प्रेम सहज दिसून येतं. या २ मुलींना नाचताना पाहून वडीलांनाही थांबवलं जात नाही ते सुद्धा त्यांच्यासोबत नाचू लागतात. या व्हिडिओत मुलींच्या डोळ्यात वडीलांबाबतचे प्रेम सहज दिसून येतं. हा नजारा एखाद्या चित्रपटासारखा दिसून येतो. या व्हिडिओतून बाप-लेकीचं प्रेम सहज दिसून येत आहे.

या व्हिडिओवर लोक काय म्हणत आहेत?

या व्हिडिओवर नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. मुलींनी डान्स करायला सुरूवात केल्यानंतर बाबांनी जी रिएक्शन दिली ती खरंच पाहण्यासारखी आहे. हा व्हिडिओ तुम्हालाही वारंवार पाहावासा वाटेल. आपल्या लेकींना डान्स करताना पाहून दमलेल्या बाबांची रिएक्शन खरंच मौल्यवान आहे. नेटिझन्स या मुलींच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter's dance melts father's fatigue after work: Viral video.

Web Summary : A heartwarming video shows daughters welcoming their father home from work with a surprise dance. Overwhelmed with joy, the father sheds his fatigue and joins in, creating a touching family moment. The video is winning hearts online.
टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ