Lokmat Sakhi >Social Viral > हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

एक लहान मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारून मोठ्याने रडताना दिसत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 20:22 IST2025-05-10T20:20:47+5:302025-05-10T20:22:07+5:30

एक लहान मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारून मोठ्याने रडताना दिसत आहे

daughter cried while hugging the soldier going on duty watching the video will bring tears to your eyes too | हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. अशाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. ज्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारून मोठ्याने रडताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर जवानांना पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यास सांगण्यात आलं. याच दरम्यान हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मिठ्ठी मारली.

मुलगी वडिलांना सोडण्यास तयार होत नाही. पप्पा तुम्ही जाऊ नका असं ती वारंवर आपल्या वडिलांना सांगते. त्यावर वडील तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि लवकरच मी परत येईल असं सांगतात. पण मुलीचं रडणं काही थांबत नाही. या व्हिडीओमधून जवानाच्या कुटुंबीयांच्या भावना समोर आल्या आहेत. त्यांना आपल्या प्रियजनांपासून बराच काळ दूर राहावे लागते. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भावुक झाले आहे. 

व्हिडिओमध्ये, एक जवान कर्तव्यावर परतण्यासाठी तयार होऊन उभा असल्याचं पाहायला मिळतं. त्याची लहान मुलगी आहे, जी त्याला सोडायला अजिबात तयार नाही. वडील तिला मिठी मारताच, मुलगी  मोठ्याने रडू लागते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुलगी तिच्या वडिलांना सोडण्यास तयार नाही. हा व्हायरल व्हिडिओ अनुराधा शर्मा नावाच्या अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स विविध कमेंट करत आहेत. लोक त्या जवानाच्या देशभक्तीला आणि मुलीच्या भावनांना सलाम करत आहेत. आपले जवान नेहमीच सुरक्षित राहावेत अशी अनेक जण प्रार्थना करत आहेत. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करत घेतलेला बदला, यानंतर मागच्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. असं असलं तरी प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना त्याग करावा लागतो. भारतमातेच्या रक्षणासाठी जवान स्वत:चं बलिदान देतात. जवानाच्या कुटुंबीयांचे भावुक करणारे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होत असतात.
 

Web Title: daughter cried while hugging the soldier going on duty watching the video will bring tears to your eyes too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.