Join us

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर डोला रे डोला म्हणत तरुणांचा ढिंचॅक डान्स, लेहेंगा घालून असे नाचले की.... बघा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2023 14:07 IST

Viral Video of Devdas Movie Song Dola re Dola Dance by Indian And Canadian Men on New York Street Wearing Lehenga : ऐश्वर्या आणि माधुरीच्या एनर्जीनेच या तरुणांनी हा डान्स केल्याचे दिसते.

ठळक मुद्दे३ दिवसांत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून २ लाख ४० हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.जॅनिल यानी या पोस्टला कॅप्शन देताना यातली ऐश्वर्या कोण आणि माधुरी कोण ओळखा असे म्हटले आहे.

डान्स म्हटलं की अनेकांची पाऊलं अगदी सहज थिरकायला लागतात. त्यातही बॉलिवूडच्या गाण्यांवर तर जगभरातील लोकांना डान्स करायला आवडतो. बरेचदा परदेशी नागरीक हिंदी गाण्यांवर मनसोक्त नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून २ तरुण यामध्ये ‘देवदास’ या चित्रपटातील गाजलेल्या ‘डोला र, डोला...’ य़ा गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत (Viral Video of Devdas Movie Song Dola re Dola Dance by Indian And Canadian Men on New York Street Wearing Lehenga).

विशेष म्हणजे हे तरुण भारतात नाही तर चक्क न्यूयॉर्कमधील रस्त्यावर हा डान्स करताना दिसत आहेत. या मुलांनी चक्क या डान्ससाठी लेहंगाही घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. भारतातील जॅनिल मेहता आणि कॅनडाचा एलेक्स वॉन्ग अशी या डान्स करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांचे ९० च्या दशकातील हे गाजलेले गाणे असून यामध्ये त्या दोघींनधील एनर्जी दिसते. त्याच एनर्जीने या तरुणांनी हा डान्स केल्याचे दिसते. जॅनिल याचे याआधीही काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

या दोघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या ३ दिवसांत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून २ लाख ४० हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर जॅनिल यानी या पोस्टला कॅप्शन देताना यातली ऐश्वर्या कोण आणि माधुरी कोण ओळखा असे म्हटले आहे. हे दोघेही पेशाने युट्यूबर असून अनवाणी पावलांनी अशाप्रकारे डान्स करत आहेत. आमच्या पायांना शांती मिळो असेही त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलनृत्यसोशल मीडिया