lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste राखी बांधून झाली, आता फेकू नका, तयार करा ६ फॅन्सी गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2023 10:41 AM2023-09-01T10:41:48+5:302023-09-01T10:42:53+5:30

Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste राखी बांधून झाली, आता फेकू नका, तयार करा ६ फॅन्सी गोष्टी

Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste | महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

भाऊ - बहिणीचा प्रेमळ सण म्हणजेच राखी पौर्णिमा. हा सण यंदा ३० ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. अनेक दिवसांपासून बाजारपेठ नवीन राख्यांनी सजलेली होती. आपल्या भावाच्या मनगटावर कोणती राखी शोभून दिसेल, यासाठी बहिणी रोज नवनवीन राख्या पाहण्यासाठी, बाजारपेठात हजेरी लावत होत्या.

सुंदर, नाजूक, रेशमी धाग्यांनी तयार राख्या पाहताक्षणी मनात भरत असे. पण हा सण साजरा झाल्यानंतर राख्या कपबोर्डच्या कोणत्यातरी कोपऱ्यात पडून राहतात. राख्यांना फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर आपण डीआयवाय डेकोरेशनसाठी नक्कीच करू शकता. जुन्या राख्यांचा वापर करून आपण स्वतःसाठी ब्रेसलेट, बिंदी, हेअर बँड तयार करू शकता. ते कसे पाहूयात(Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste).

ब्रेसलेट

जर आपण सिल्व्हर किंवा सोनेरी डिजाईनची राखी खरेदी केली असेल, तर त्या राखीचा वापर करून स्वतःसाठी फॅन्सी ब्रेसलेट तयार करा. त्यातील मोती, स्टोन काढून आवडत्या, चैनमध्ये चिटकवून ब्रेसलेट तयार करा.

स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब

मांग टीका

बिंदी हा प्रकार तरुणींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपण राखीपासून बिंदी तयार करू शकता. यासाठी राखीला सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचा वापर करा. व त्यातील काही मोती एका धाग्यात बांधून घ्या, व त्याच्या दुसऱ्या टोकाला हुक लावा. जर आपल्याला धागा नको असेल तर चैनमध्ये बिंदी तयार करा.

हेअरबँड

हेअरबँडची फॅशन फार जुनी आहे. आपण राखीचा वापर करून फॅशनबल हेअरबँड तयार करू शकता. यासाठी हेअरबँड घ्या, त्यावर राखीवरील स्टोन आणि मोती चिटकवा. या डिझाईनमुळे हेअरबँड केसांवर सुंदर दिसेल.

इअर टॉप

घरात पडलेल्या सर्व राख्या गोळा करा. त्यातील मोती आणि स्टोन काढून एका बाऊलमध्ये ठेवा. दोन इअर टॉप्सचे सेट तयार करा. बाजारातून इअर हुक विकत आणा. व मॅचिंग इअर टॉप्स तयार करा.

माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला..

हेअर क्लिप

ज्यांच्या घरात मुलगी, महिला आहे, त्यांच्या घरात हेअर क्लिप असणारच. हेअर क्लिप केसांवर हेअर स्टाईल करण्यासाठी वापरण्यात येते. आपण त्यावर राख्यांचे मोती आणि स्टोन चिटकवून फॅन्सी हेअर क्लिप तयार करू शकता.

Web Title: Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.