lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे बापरे! एका जोडप्याला स्वित्झर्लंड वारी पडली महागात! फोनचे बिल कोटींच्या घरात, पुढे जे झालं...

अरे बापरे! एका जोडप्याला स्वित्झर्लंड वारी पडली महागात! फोनचे बिल कोटींच्या घरात, पुढे जे झालं...

Couple slapped with ₹1.1 crore phone bill after returning from vacation. Here's what happened : ...म्हणजे कहरचं! ३ आठवड्यासाठी, १ कोटी १९ लाख बिल ते ही मोबाईल डेटासाठी कोण आकारतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 05:30 PM2024-04-22T17:30:28+5:302024-04-22T17:31:23+5:30

Couple slapped with ₹1.1 crore phone bill after returning from vacation. Here's what happened : ...म्हणजे कहरचं! ३ आठवड्यासाठी, १ कोटी १९ लाख बिल ते ही मोबाईल डेटासाठी कोण आकारतं?

Couple slapped with ₹1.1 crore phone bill after returning from vacation. Here's what happened | अरे बापरे! एका जोडप्याला स्वित्झर्लंड वारी पडली महागात! फोनचे बिल कोटींच्या घरात, पुढे जे झालं...

अरे बापरे! एका जोडप्याला स्वित्झर्लंड वारी पडली महागात! फोनचे बिल कोटींच्या घरात, पुढे जे झालं...

फिरायला गेल्यावर आपला जास्त खर्च कुठे होतो? अर्थात फिरण्यात, खाण्यात किंवा फार तर फार काही वस्तू घेण्यात (Social Viral). पण जास्त खर्च फिरण्यापेक्षा कधी मोबाईलच्या बिलावर झालं असल्याचं ऐकलं आहे का? एका वृद्ध जोडप्याला स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवणे चांगलेच महागात पडले आहे. सुट्टीचा आनंद लुटल्यानंतर, जेव्हा हे जोडपे मायदेशी परतले, तेव्हा फोनचे बिल पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला.

एबीसीच्या रिपोर्टनुसार, त्यांना परदेशात मोबाईल डेटा वापरण्यासाठी एकूण १ कोटी १९ लाख रुपयांचे बिल आले. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून, काही क्षणासाठी त्यांची पायाखालची जमीनच सरकली. पुढे नक्की काय घडले? एवढे मोबाईलचे बिल आलेच कसे? पाहूयात(Couple slapped with ₹1.1 crore phone bill after returning from vacation. Here's what happened).

अव्वाच्या सव्वा फोनचे बिल आलेच कसे?

अमेरिकेतील फ्लोरिडास्थित एका वृद्ध जोडप्याला स्वित्झर्लंड वारी चांगलीच महागात पडली. ७१ वर्षीय रेने रेमंड आणि त्यांची ६५ वर्षीय पत्नी लिंडा, ३ आठवड्यासाठी स्वित्झर्लंडला गेले होते. त्यांचा जास्त खर्च फिरण्यात, खाण्यात किंवा वस्तू घेण्यात झाला नसून, तर फोनचे बिल भरण्यात झाला आहे. आता तुम्ही म्हणाल, ते कसे? ३ आठवड्यांसाठी त्यांना नेट डेटा वापरल्याबद्दल दररोज सरासरी ५ लाख रुपयांचे बिल आकारण्यात आले होते.

मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..

एबीसी अॅक्शन न्यूज मिडियाला माहिती देताना, रेने सांगतात, 'गेल्या ३० वर्षांपासून मी टी-मोबाइलचा ग्राहक आहे. प्रवासापूर्वी प्रवासाशी संबंधित सर्व योजनांची माहिती त्यांना दिली होती. त्यावेळी कंपनीने त्यांना कळवले की त्यांनी दिलेल्या योजनेत तुमचा समावेश आहे. पण मायदेशी परतल्यानंतर त्यांना तीन आठवड्यांच्या सुट्टीत घालवलेले, ९.५ जीबी डेटा वापरासाठी शुल्क आकारले गेले आहे.'

पुढे ते म्हणतात 'त्यानंतर ताबडतोब टी-मोबाईल हेल्प सेंटरवर कॉल केला. व सर्व समस्या शेअर केली. यावर कंपनीने उत्तर दिले की, तुमच्या फोनवर जे काही बिल आकारण्यात आले, ते पूर्णपणे बरोबर आहे.' यावर रेमंडला धक्का बसला.

पोलीस कॉन्स्टेबलच्या बहिणीची लग्नपत्रिका व्हायरल; लग्नात नक्की या पण, मतदान..

त्यानंतर रेमंडने कंपनीच्या विरोधात कायदेशीर मदत घेतली. शेवटी, मीडियाच्या हस्तक्षेपानंतर, टी-मोबाइलने प्रतिसाद दिला आणि संपूर्ण रक्कम रेमंडच्या खात्यात जमा करण्यास सहमती दर्शवली. 

Web Title: Couple slapped with ₹1.1 crore phone bill after returning from vacation. Here's what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.