Join us
Daily Top 2Weekly Top 5

५ रुपयांची १ सोपी ट्रिक, कुलरच्या हवेतही वाटेल एसीसारखे गारेगार-घरात उकाडा जाणवणारच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:46 IST

Cooling Tips : कुलरमुळे घर थंड राहतं, पण जेव्हा बाहेरचं तापमान वाढतं तेव्हा कुलरमधूनही गरम हवा येऊ लागते. आपल्या घरातही असंच होत असेल चिंता सोडा.

Cooling Tips : उन्हाचा पारा इतका वाढलाय की, एसी, कुलरही हवा तसा थंडावा देऊ शकत नाही. दिवसा घर असं काही तापतं की, घरात राहणं अवघड होऊन बसतं. अशात सगळेच घरातील प्रत्येक कोपरा थंड करण्यासाठी काहीना काही उपाय शोधत असतात. जास्तीत जास्त लोक घरात एसी लावतात. पण एसीचं बिल काही परवडणारं नसतं. अशात कुलर हा सगळ्यांना परवडणारा ठरतो.   

कुलरमुळे घर थंड राहतं, पण जेव्हा बाहेरचं तापमान वाढतं तेव्हा कुलरमधूनही गरम हवा येऊ लागते. आपल्या घरातही असंच होत असेल तर चिंता सोडा. जर कुलरची एसीसारखी थंड हवा असेल तर आम्ही आपल्याला एक खास सोपा उपाय सांगत आहोत. फक्त ५ रूपये खर्च करून एक ट्रिक वापरून आपण कुलरच्या मदतीने घर एसीसारखं थंड करू शकता.    

जर तापमान वाढल्यामुळे घरातील कुलर बरोबर काम करत नसेल तर मीठ आणि बर्फाच्या मदतीने कुलरमधून एसीसारखी थंड हवा मिळू शकते. कुलरच्या पाण्यात जर थोडं मीठ आणि बर्फ टाकला तर कुलर जास्त वेळ थंड हवा देऊ शकतो. असं केल्याने पाण्याचं टेम्प्रेचर लवकर वाढत नाही, त्यामुळे हवा थंड लागते. यासाठी कुलरच्या पाण्यात बर्फाचे काही तुकडे टाका आणि थोडं साधं मीठ टाका. हवं तर आपण मिठाचं पाणी फ्रिजरमध्ये ठेवूनही कुलरमध्ये टाकू शकता.   

जर आपल्याला वाटत असेल की, कुलरने जास्त थंड हवा द्यावी यासाठी व्हेंटिलेशन सु्द्धा फार महत्वाचं असतं. बंद खोलीत कुलर योग्यपणे काम करत नाही. त्यामुळे दरवाजे किंवा खिडक्या उघड्या ठेवा. जेणेकरून हवा खेळती राहील. कुलर खिडकीत लावा. असं केल्याने थंड हवा पूर्ण खोलीत व्यवस्थित पसरेल आणि गरम हवा निघून जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cooler gives AC-like cooling with a simple 5-rupee trick.

Web Summary : Beat the heat! Use salt and ice in your cooler for AC-like cooling. Ensure ventilation by opening windows for optimal airflow and cooling.
टॅग्स :होम रेमेडीसोशल व्हायरल