Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नारळाच्या शेंड्यांचे इको - फ्रेंडली स्क्रबर! पाहिला नसेल असा भन्नाट जुगाड, पैसे वाचतील-भांडी चमकतील...

नारळाच्या शेंड्यांचे इको - फ्रेंडली स्क्रबर! पाहिला नसेल असा भन्नाट जुगाड, पैसे वाचतील-भांडी चमकतील...

coconut husk scrubber at home : how to make scrubber from coconut husk : eco friendly dishwashing scrubber homemade : coconut coir scrubber making process : नारळाची किशी किंवा उरलेल्या शेंड्यांपासून भांडी घासायचा स्क्रबर कसा तयार करायचा, पाहा देसी जुगाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2026 18:24 IST2026-02-14T18:14:13+5:302026-02-14T18:24:39+5:30

coconut husk scrubber at home : how to make scrubber from coconut husk : eco friendly dishwashing scrubber homemade : coconut coir scrubber making process : नारळाची किशी किंवा उरलेल्या शेंड्यांपासून भांडी घासायचा स्क्रबर कसा तयार करायचा, पाहा देसी जुगाड...

coconut coir scrubber making process how to make scrubber from coconut husk | नारळाच्या शेंड्यांचे इको - फ्रेंडली स्क्रबर! पाहिला नसेल असा भन्नाट जुगाड, पैसे वाचतील-भांडी चमकतील...

नारळाच्या शेंड्यांचे इको - फ्रेंडली स्क्रबर! पाहिला नसेल असा भन्नाट जुगाड, पैसे वाचतील-भांडी चमकतील...

सण-वार असो किंवा रोजचा स्वयंपाक, आपल्या घरात नारळाचा वापर हमखास होतो. नारळ सोलल्यानंतर आपण त्यातील खोबरे वापरतो, पण त्याच्या शेंड्या (किशी) मात्र कचरा म्हणून फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ज्या शेंड्यांना आपण कचरा समजतो, त्यापासून बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्लास्टिक स्क्रबरपेक्षाही उत्तम 'इको-फ्रेंडली' स्क्रबर तयार होऊ शकतो. हे स्क्रबर केवळ नैसर्गिक नाहीत, तर ते तुमच्या हातांसाठी आणि भांड्यांसाठी अत्यंत सुरक्षित आहेत(how to make scrubber from coconut husk).

आजकाल किचनमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक स्क्रबर काही दिवसांत खराब होतात आणि त्याचबरोबर पर्यावरणालाही हानी पोहोचवतात. पण आपल्या घरातच असणारी नारळाची किशी किंवा उरलेले नारळाचे शेंडे यापासून उत्तम स्क्रबर घरच्याघरीच तयार करता येतो. नारळ वापरल्यानंतर उरलेला हा भाग बहुतेक वेळा कचऱ्यात जातो, मात्र त्यापासून मजबूत, टिकाऊ आणि पूर्णपणे इको-फ्रेंडली भांडी घासायचा स्क्रबर तयार करता येतो. नारळाच्या तंतूंमध्ये असलेली नैसर्गिक खरखरीत रचना भांड्यांवरील तेलकटपणा आणि चिकट डाग सहज काढून टाकते, शिवाय भांड्यांचे नुकसानही होत नाही. अगदी कमी (coconut husk scrubber at home) खर्चात आणि काही सोप्या स्टेप्समध्ये तयार होणारा हा घरगुती स्क्रबर तुमच्या किचनसाठी स्मार्ट आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. कचरा समजून फेकून देत असलेल्या नारळाच्या किशीचा असा(eco friendly dishwashing scrubber homemade) भन्नाट उपयोग कसा करायचा ते पाहा... 

नारळाच्या शेंड्यांचे इको - फ्रेंडली स्क्रबर कसे तयार करायचे ?

टाकाऊतून टिकाऊ! नारळाच्या शेंड्या फेकून न देता अवघ्या १० मिनिटांत 'इको-फ्रेंडली' स्क्रबर तयार करण्याचा हा देसी भन्नाट जुगाड kahaniwalishivani या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

१. नारळाच्या शेंड्या मोकळ्या करा:- सर्वात आधी नारळाच्या शेंड्या हाताने व्यवस्थित मोकळ्या करून घ्या, जेणेकरून त्यातील कचरा आणि माती निघून जाईल. त्यानंतर या शेंड्या पाण्यांत १ पूर्ण दिवस व्यवस्थित भिजत ठेवा जेणेकरून त्या थोड्या मऊ होतील. त्यानंतर या शेंड्या ऊन्हांत व्यवस्थित वाळवून घ्या. वाळवून घेतलेल्या (coconut coir scrubber making process) या शेंड्या लाटणीच्या मदतीने हलकेच दाब देत लाटून सरळ करुन घ्याव्यात. मग या शेंड्या कंगव्याच्या मदतीने केसांप्रमाणेच विंचरून अगदी सरळ करून घ्याव्यात.  

२. आकार द्या :- या शेंड्यांचा एक जाड जुडगा एकत्र करा. तुम्हाला स्क्रबर जेवढ्या आकाराचा हवा आहे, तेवढ्या प्रमाणात शेंड्या घ्या. 

३. गुंडाळणे :- एकत्र केलेल्या शेंड्यांना हाताने गोल किंवा लंबगोलाकार आकार द्या. त्यानंतर सुती दोऱ्याने किंवा सुतळीने मध्यभागी घट्ट बांधून घ्या. 

खाऊसाठी मिळालेल्या पैशांचं पाहा १० वर्षांच्या मुलीने पाहा काय केलं! भलेभले झाले चकीत, पोरीचं डोकं आहे की...

जास्वंद, गुलाबाच्या रोपाला येईल फुलांचा बहर! केळीच्या सालीचे 'पॉवरफुल' खत - माती होईल सुपीक, रोप वाढतील भरभर... 
 

४. कात्रीने बाजू कापून फिनिशिंग द्या :- बाजूला आलेल्या जास्तीच्या शेंड्या कात्रीने कापून घ्या, ज्यामुळे तुमचा स्क्रबर दिसायला सुबक आणि पकडायला सोयीस्कर होईल. 

५. वापरण्यास तयार :- तुमचा १००% नॅचरल स्क्रबर तयार आहे. हा स्क्रबर वापरून आपण लोखंडी कढईपासून ते नॉन-स्टिक पॅनपर्यंत सर्व भांडी घासण्यासाठी वापरू शकता.


नारळाच्या शेंडीचे स्क्रबर वापरण्याचे फायदे :-

१. केमिकल मुक्त :- प्लास्टिकच्या स्क्रबरमधून सूक्ष्म प्लास्टिक कण (Microplastics) अन्नात जाण्याची भीती असते, मात्र हा स्क्रबर पूर्णपणे सुरक्षित आहे.

२. कमी खर्च :- हा स्क्रबर बनवण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.

३. स्वच्छता :- नारळाच्या तंतूंमध्ये कडकपणा असतो, ज्यामुळे भांड्यांवरील हट्टी डाग सहज निघतात.

Web Title : नारियल के जटा से इको-फ्रेंडली स्क्रबर: किफायती और पर्यावरण के लिए बेहतर

Web Summary : नारियल के कचरे से इको-फ्रेंडली स्क्रबर बनाएं! यह प्राकृतिक स्क्रबर हाथों और बर्तनों के लिए सुरक्षित है, जो पर्यावरण को नुकसान पहुंचाए बिना चिकनाई को प्रभावी ढंग से हटाता है। घर पर बनाना आसान, प्लास्टिक स्क्रबर का किफायती और टिकाऊ विकल्प।

Web Title : Coconut coir scrubbers: Eco-friendly, cost-effective cleaning for sparkling dishes.

Web Summary : Transform coconut waste into eco-friendly scrubbers! These natural scrubbers are safe for hands and dishes, effectively removing grease without harming the environment. Easy to make at home, they offer a cost-effective and sustainable alternative to plastic scrubbers.