Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्याच्या दिवसात कपडे वाळतच नाहीत, घाई असताना कपडे वाळवण्यासाठी '३' सोप्या ट्रिक्स

पावसाळ्याच्या दिवसात कपडे वाळतच नाहीत, घाई असताना कपडे वाळवण्यासाठी '३' सोप्या ट्रिक्स

Clothes don't dry on rainy days, '3' simple tricks to dry clothes when in a hurry : पावसाळ्यात कपडे झटपट वाळावेत यासाठी खास उपाय. पाहा काय करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 12:00 IST2025-05-27T11:56:52+5:302025-05-27T12:00:46+5:30

Clothes don't dry on rainy days, '3' simple tricks to dry clothes when in a hurry : पावसाळ्यात कपडे झटपट वाळावेत यासाठी खास उपाय. पाहा काय करायचे.

Clothes don't dry on rainy days, '3' simple tricks to dry clothes when in a hurry | पावसाळ्याच्या दिवसात कपडे वाळतच नाहीत, घाई असताना कपडे वाळवण्यासाठी '३' सोप्या ट्रिक्स

पावसाळ्याच्या दिवसात कपडे वाळतच नाहीत, घाई असताना कपडे वाळवण्यासाठी '३' सोप्या ट्रिक्स

उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो. शरीराला त्रास होतो. उन्हामुळे फार हालत होते. मात्र उन्हाळ्यात एक गोष्ट चांगली असते ती म्हणजे कपडे छान कडक वाळतात. कपडे वाळत घालायला उशीर झाला तरी काही हरकत नसते. अगदी दोन तासात कपडे वाळून जातात. मात्र एकदा का पाऊस सुरु झाला की कपडे वाळता वळत नाहीत. ओले कपडे घालू शकत नाही. (Clothes don't dry on rainy days, '3' simple tricks to dry clothes when in a hurry)अनेक जण ओले कपडे वापरतात. मात्र जराही दमट असलेला कपडा वापरणे शरीरासाठी चांगले नाही. असे कपडे त्वचेसाठी चांगले नाहीत. वळ उठतात. त्वचा काचते तसेच इतरही काही त्रास होतात. त्यामुळे कपडे छान वाळलेलेच वापरावेत. 

पावसाळ्यात कपडे उन्हाळ्यात वाळतात तसे कडक तर वाळत नाहीत. मात्र वापरता येतील एवढे जरी वाळले तरी वापरता येतात. (Clothes don't dry on rainy days, '3' simple tricks to dry clothes when in a hurry)मात्र दुपारच्या वेळीही आकाश भरलेले असल्याने कपडे वाळायला एक दिवस पुरेसा होतच नाही. कपडे ओलेच राहतात. किंवा मग दमट राहतात. दमट कपडे वापरले तर त्याला उबट वास येतो. तो वास वाढत जातो. त्यामुळे असे दमट कपडे आपण वापरत नाही. काही सोपे उपाय आहेत ज्यांचा वापर करुन घाई असताना तुम्ही कपडे पटकन वाळवू शकता. सतत असे उपाय करु नयेत मात्र घाई असताना खास पावसाळ्यात असे उपाय अगदी फायद्याचे ठरतात.

१. घरी पोळ्यांसाठी तवा असतोच. रोजच्या वापराचा नाही तर जास्तीचा ठेवलेला आणखी तवा तसा सगळ्यांकडे माळ्यावर पडून असतो. जेवणासाठी जो तवा वापरत नाही तो तपा मस्त गरम करायचा. तव्यावर ओले कपडे ठेवायचे आणि वाळवून घ्यायचे. असेच ठेवायचे नाही. कपडे करपतात. तवा तापला की गॅस बंद करायचा आणि सतत आलटून पालटून कपडे वाळवायचे. वाळतातही आणि जरा गरम छान वाटतात. 

२. घरी इस्त्री असेल तर मग उत्तमच. गरम कपड्यांवर इस्त्री फिरवायची. मात्र इस्त्री नसेल तवा खराब करायचा नसेल तर स्टीलच्या भांड्यात उकळते गरम पाणी ओतायचे आणि ते भांड कपड्यांर फिरवायचे. जरा हटके अशी पद्धत असली तरी वर्षानुवर्षे महिला असे उपाय करत आल्या आहेत. 

३. कपडे रात्री पंख्याखाली वाळत घालायचे. हा उपाय तुम्ही नक्की करतच असाल. कपडे आपण एकदा वाळत घातले की ते वाळल्यावरच काढतो मात्र पावसाळ्यात कपडे आलटून-पालटून वाळवायचे. कोरड्या टॉबेलमध्ये ओले कपडे ठेवायचे आणि मग त्यावर इस्त्री फिरवायची हा उपायही चांगला आहे.

Web Title: Clothes don't dry on rainy days, '3' simple tricks to dry clothes when in a hurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.