Lokmat Sakhi >Social Viral > कपाटाचे दरवाजे-खिडक्यांचे स्लायडींग सारे झटक्यात होईल साफ होईल, स्पंज ' या' पद्धतीने वापरा-स्वच्छता झटपट

कपाटाचे दरवाजे-खिडक्यांचे स्लायडींग सारे झटक्यात होईल साफ होईल, स्पंज ' या' पद्धतीने वापरा-स्वच्छता झटपट

cleaning tips, sliding cupboard doors and windows will all be cleaned in an instant, use a sponge in this way - instant cleaning : स्वच्छता करताना लक्षात ठेवा या टिप्स. खाचेत अडकलेला कचरा काढा झटपट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2025 16:28 IST2025-08-10T16:27:20+5:302025-08-10T16:28:20+5:30

cleaning tips, sliding cupboard doors and windows will all be cleaned in an instant, use a sponge in this way - instant cleaning : स्वच्छता करताना लक्षात ठेवा या टिप्स. खाचेत अडकलेला कचरा काढा झटपट.

cleaning tips, sliding cupboard doors and windows will all be cleaned in an instant, use a sponge in this way - instant cleaning | कपाटाचे दरवाजे-खिडक्यांचे स्लायडींग सारे झटक्यात होईल साफ होईल, स्पंज ' या' पद्धतीने वापरा-स्वच्छता झटपट

कपाटाचे दरवाजे-खिडक्यांचे स्लायडींग सारे झटक्यात होईल साफ होईल, स्पंज ' या' पद्धतीने वापरा-स्वच्छता झटपट

आता घरोघरी स्लायडींगच्या खिडक्या तसेच कपाटाचे दरवाजेही स्लायडींगचे असतात. वापरायला सोपे आणि टिकाऊ असल्यामुळे सगळेच असे दरवाजे लावतात. घराला शो ही छान येतो. (cleaning tips,  sliding cupboard doors and windows will all be cleaned in an instant, use a sponge in this way - instant cleaning)या दरवाज्यांचा त्रास फक्त एकच आहे तो म्हणजे त्याच्या खाचेत साचणारा कचरा. दरवाजा स्लाईड व्हावा यासाठी तयार केलेली जागा किंवा गॅप अगदीच लहान असते. साफ करायला किचकट असते. उंचवटा असल्यामुळे त्यात पाणी ओतून साफ करणे कठीण जाते. पाणी तसेच साठून राहते. काही घरगुती उपायांनी कमी कष्टात ती जागा साफ करता येते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. 

१.  सगळ्यात मस्त उपाय म्हणजे स्पंजचा वापर करणे. स्पंजमध्ये पाणी शोषला जातो. तसेच माती चिकटते. स्पंज आकार आरामात बदलतो. त्यामुळे किचकट जागांमध्ये फिरवायला सोपा असतो. त्यामुळे पाणी खाचेत घालायचे. जरा ब्रशने साफ करायचे नंतर त्यामधून स्पंज फिरवायचा. माती साफ होते. 

२. स्लायडिंगच्या खाचा किंवा कपाटाच्या खाचा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे कारण इथे धूळ, केस, लहान कण आणि कधी कधी तेलकट मळही साठतो. हा मळ वेळेवर काढला नाही तर स्लायडिंग अडकू लागते, कपाटाच्या दरवाजे आरामात सरकत नाहीत. खराब होतात. खाचा स्वच्छ करताना सर्वात आधी त्यातील सुकी धूळ काढायची. यासाठी जुना टूथब्रश, छोटा पेंटब्रश किंवा मेकअप ब्रश वापरू शकता. ही धूळ लगेच काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरचा पातळ नोजल वापरु शकता. व्हॅक्यूम नसेल तर एका पातळ पट्टीभोवती किंवा काठीभोवती मायक्रोफायबर कपडा गुंडाळून तो खाचेत फिरवा अगदी मस्त जुगाड आहे. यामुळे कोपऱ्यांतील धूळ आणि मळ निघून जातो.

जर खाचेत मळ जास्त चिकट असेल तर कोमट पाण्यात थोडे लिक्विड डिटर्जंट किंवा साबण मिसळून एक ओलसर कापूस किंवा कपडा घ्या आणि तो आत हलक्या हाताने फिरवा. जास्त पाणी वापरू नका कारण खाचेत ओलावा राहिला तर गंजण्याची शक्यता असते. स्वच्छ केल्यानंतर लगेच कोरड्या कपड्याने पुसून घ्या. 

ही साफसफाई महिन्यातून किमान एकदा केली तर स्लायडिंग कपाटे, खिडक्या किंवा दरवाजे नेहमी स्वच्छ आणि नीट चालू राहतात. त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता करण्याची सवय लावली तर पुढे मोठी मेहनत घ्यावी लागत नाही आणि घरही स्वच्छ दिसते.

 

Web Title: cleaning tips, sliding cupboard doors and windows will all be cleaned in an instant, use a sponge in this way - instant cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.