स्वयंपाक घरात वापरले जाणारे गॅस लायटर ही एक अतिशय महत्वाची वस्तू आहे. गॅस लायटर दररोज सतत वापरात असल्यामुळे ते कितीही स्वच्छ ठेवले तरीही ठराविक दिवसांनी खराब, अस्वच्छ दिसते. स्वयंपाक घरातील तेलाचे चिकट डाग, धूर, मसाल्यांचे डाग या लायटरवर लागून ते चिकट, तेलकट होते. असे हे खराब (Cleaning Tips For Rusty & Old Kitchen Gas Lighters) व तेलकट, चिकट झालेले लायटर हातात घेणे देखील नकोसे वाटू लागते. गॅस लायटरवर (How To clean an old lighter) बसलेला चिकट थर आणि त्याला येणारी खराब, कुबट दुर्गंधी यामुळे ते गॅस लायटर वापरणे आपण टाळतो. अशा खराब अवस्थेत हे लायटर वापरल्यास, ते वापरताना अनेक अडचणी येऊ शकतात, किंवा लवकरच असे अस्वच्छ खराब झालेले गॅस लायटर काम करणे देखील बंद करू शकते(How to Clean Gas Lighter).
अशा परिस्थिती, आपण हे मळकट, खराब झालेले गॅस लायटर चक्क फेकून देण्याचा विचार करतो, परंतु असे करण्याची गरज नाही, एक छोटीशी ट्रिक तुमचं लायटर पुन्हा नव्यासारखं स्वच्छ, चमकदार आणि वापरण्यास योग्य बनवू शकते. चिकट आणि तेलकट गॅस लायटरला पुन्हा नव्यासारखं स्वच्छ करणं अगदी सोपं आहे! घरच्याघरीच उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने तुम्ही लायटरवर साचलेला मळ, चिकटपणा आणि तेलकट डाग अगदी सहजपणे काढू शकता. फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये गॅस लायटर कसे स्वच्छ करावे याची सोपी ट्रिक पाहूयात...
गॅस लायटर स्वच्छ करण्याच्या ३ सोप्या स्टेप्स कोणत्या ते पाहूयात...
स्टेप १ :- खराब झालेल्या गॅस लायटरवरील चिकट, तेलकट, मेणचट डाग घालवण्यासाठी, सर्वातआधी एका बाऊलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घ्यावा लागेल आणि त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. ही तयार पेस्ट लायटरच्या त्या भागांवर लावा जिथे गंज, चिकटपणा किंवा घाण साचली आहे. यानंतर, जुन्या टूथब्रशच्या मदतीने हळूहळू गॅस लायटर घासून घ्यावे आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. हा उपाय केल्याने लायटर स्वच्छ होतो आणि त्याची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहते, शिवाय तो खराबही होत नाही.
प्रेशर कुकरचे रबर सैल झाले, वाफ बाहेर येते? सोपे ५ उपाय, एकदम चटकन करा दुरुस्त...
स्टेप २ :- आता एका भांड्यात कपभर कोमट पाणी घेऊन त्यात, व्हाईट व्हिनेगर मिसळा. कोमट पाणी आणि व्हाईट व्हिनेगर समप्रमाणात घ्यावे. हे मिश्रण एकत्रित करून या मिश्रणात सुती कापड भिजवून त्या कापडाने लायटर स्वच्छ पुसून घ्यावे. जिथे चिकट, तेलकट डाग राहिले असतील ते या द्रावणाच्या मदतीने अगदी सहजपणे काढण्यास मदत होईल. लायटरचा प्लास्टिक किंवा इलेक्ट्रिक भाग कधीही व्हिनेगरच्या पाण्यात बुडवू नका. त्यामुळे तो भाग खराब होऊ शकतो.
स्टेप ३ :- गॅस लायटर बाहेरून स्वच्छ करणे जितके गरजेचे असते तितकेच ते आतून स्वच्छ करणे देखील महत्वाचे असते. यासाठी आपण टोकदार टूथपिक किंवा सुईचा वापर करु शकतो. गॅस लायटरच्या नोजलमध्ये धूळ, तेल किंवा कार्बन जमा झाल्यामुळे स्पार्क निर्माण होत नाही. अशावेळी, एक पातळ सुई, टूथपिक किंवा पिन घेऊन, नोजल किंवा स्पार्क व्हीलच्या आसपास हलक्या हाताने स्वच्छता करावी लागते. असे केल्यामुळे गॅस लायटरच्या नोजलमध्ये साचलेले कार्बन किंवा कचरा काढून टाकता येतो आणि गॅस लायटर पुन्हा नव्यासारखे काम करु लागेल. स्वच्छता करताना खूप जास्त जोर किंवा दाब देऊ नका, कारण त्यामुळे गॅस लायटरच्या आतील नाजूक यंत्रणा तुटण्याची शक्यता असते.
अशा प्रकारे आपण फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून अगदी झटपट गॅस लायटर स्वच्छ करु शकता.