Lokmat Sakhi >Social Viral > बेडखाली-कपाटावर-माळ्यावर साचलेली घाण-जाळेजळमटे साफ करण्याची ट्रिक, घरातल्या आजारपणांचं ‘हे’ कारण

बेडखाली-कपाटावर-माळ्यावर साचलेली घाण-जाळेजळमटे साफ करण्याची ट्रिक, घरातल्या आजारपणांचं ‘हे’ कारण

cleaning tips, clean dirt accumulated under the bed, 'this' may cause illnesses, healthcare tips : घराच्या कानाकोपऱ्यात अडकलेली आणि साचलेली घाण साफ करणे फार गरजेचे असते. पाहा साफसफाईसाठी टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2025 11:50 IST2025-07-25T11:49:20+5:302025-07-25T11:50:45+5:30

cleaning tips, clean dirt accumulated under the bed, 'this' may cause illnesses, healthcare tips : घराच्या कानाकोपऱ्यात अडकलेली आणि साचलेली घाण साफ करणे फार गरजेचे असते. पाहा साफसफाईसाठी टिप्स.

cleaning tips, clean dirt accumulated under the bed, 'this' may cause illnesses, healthcare tips | बेडखाली-कपाटावर-माळ्यावर साचलेली घाण-जाळेजळमटे साफ करण्याची ट्रिक, घरातल्या आजारपणांचं ‘हे’ कारण

बेडखाली-कपाटावर-माळ्यावर साचलेली घाण-जाळेजळमटे साफ करण्याची ट्रिक, घरातल्या आजारपणांचं ‘हे’ कारण

घर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक वेळा फक्त डोळ्यांना पटकन दिसणार्‍या जागा स्वच्छ केल्या जातात. खरी गरज तर कपाटाच्या वरती आणि बेडच्या खाली साफ करायची असते. (cleaning tips, clean dirt accumulated under the bed, 'this' may cause illnesses, healthcare tips)घराच्या कानाकोपऱ्यात साचलेली माती, धूळ आणि घाण दुर्लक्षित राहते. हीच घाण हळूहळू कीटक, दुर्गंधी आणि अ‍ॅलर्जीचा मुख्य स्रोत ठरू शकते. त्यामुळे अशा अडगळीच्या जागा नियमितपणे स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे.

कपाटाच्या वरच्या भागात धूळ फार लवकर साचते कारण ती जागा रोजच्या वापरात नसते. स्वच्छतेसाठी सर्वप्रथम एक जुना ओला फडका घेऊन कपाटा वरचा भाग एका रेषेत फडका फिरवत पुसून घ्यायचा. जर फार जास्त धूळ असेल तर प्रथम कोरड्या कापडाने हलकेच झटकून नंतर ओल्या कपड्याने पुसायचे. या भागात गादी, चादरी, जुनं साहित्य साठवलं असल्यास ते दर महिन्याला खाली उतरवून धूळ झटकावी आणि पुन्हा नीट रचून ठेवावे. कपाटावर कागद घालावा. धूळ कपाटाला चिकटत नाही.

बेडच्या खाली देखील धूळ खूप साचते कारण ती जागा नेहमी दुर्लक्षित राहते. झाडू फिरवण्यासाठी वाकायचा आपण आळस करतो.  बेड हलवण्यासारखा असेल तर तो उचलून साफसफाई करणं उत्तम. पण जर हलवता येत नसेल, तर लांब हँडल असलेला झाडू किंवा व्हॅक्युम क्लिनर वापरून खालील धूळ बाहेर काढावी. अधूनमधून ती जागा ओल्या कपड्याने पुसणं गरजेचं आहे. जर बेडखाली सामान ठेवलेलं असेल, तर ते बंद बॉक्समध्ये ठेवावं आणि त्या बॉक्सची बाहेरूनही स्वच्छता करावी. बेडच्या खाली झाडू जात नसेल तर त्या जागेत काठीच्या मदतीने सफाई करता येते. त्यासाठी लांब बारीक काठीला फडका बांधायचा आणि तो बेडखाली फिरवायचा. 

घराच्या कानाकोपऱ्यात देखील धूळ, कोळ्याचे जाळे आणि माती साचते. हे जाळे नियमितपणे झाडून साफ करायचे. कोपऱ्यांमध्ये पोहोचण्यासाठी लांब गाठ असलेलं झाडू मिळतात ते वापरा. काही वेळा या ठिकाणी ओलाव्यामुळे बुरशीसुद्धा येते. त्यामुळे कोपरे पुसताना सॅनिटायझर किंवा सौम्य सॅल्फरयुक्त फिनाइलचा वापर करा.

ही सर्व स्वच्छता करताना मास्क आणि हातमोजे वापरणं उपयुक्त ठरेल. कारण साचलेली धूळ आरोग्यास हानिकारक असते. झाडू, कपडा किंवा व्हॅक्युम क्लिनर वापरून दर आठवड्याला या जागा साफ केल्यास घर नेहमी स्वच्छ आणि निरोगी राहील. घरातल्या लपलेल्या कोपऱ्यांची नियमित देखभाल ही घर स्वच्छ ठेवण्याच्या सवयीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Web Title: cleaning tips, clean dirt accumulated under the bed, 'this' may cause illnesses, healthcare tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.