Join us

एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक! करा 'हा' जुगाड - फॅन चमकेल नव्यासारखा लख्ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 12:45 IST

clean sticky exhaust fan at home : exhaust fan cleaning hacks : how to clean kitchen exhaust fan : best way to clean sticky exhaust fan : how to clean sticky exhaust fan at home simple hacks to make it shine like new : गणेशोत्सवापूर्वी किचनची सफाई करताना, एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी खास टिप्स..

सणवार सुरु होण्यापूर्वीच आपण सगळेच घराची साफसफाई करतो. किचनपासून ते अगदी घराच्यागॅलरी पर्यंत सगळंच धुवून - पुसून स्वच्छ करून लखलखीत करतो. किचन स्वच्छ करणे (best way to clean sticky exhaust fan) एकवेळ सोपे वाटते पण किचनमधील तेलकट, चिकट एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करणे म्हणजे सर्वात कठीण आणि वेळखाऊ काम. किचनमध्ये कायम चालू असणारा (how to clean kitchen exhaust fan) तळणाचा धूर, मसाल्यांचे गंध, वाफ बाहेर फेकण्याचे काम हा छोटा एक्झॉस्ट (clean sticky exhaust fan at home) फॅन करतो. किचनमधील सर्वात उपयोगी असलेला हा एक्झॉस्ट फॅन वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकेच गरजेचे असते. एक्झॉस्ट फॅन वरील जाळी आणि त्या पंख्याच्या पाती अगदीच तेलकट चिकट होतात, त्यावर अक्षरशः धुळीचा थर साचतो. हा धुळीचा थर स्वच्छ करणे वाटते तितके सोपे काम मुळीच नसते( how to clean sticky exhaust fan at home simple hacks to make it shine like new).

एक्झॉस्ट फॅन वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास त्यावरील चिकट, तेलकट थर हा अधिकच जाडसर होऊन, एक्झॉस्ट फॅनच्या जाळी व पात्यांवर चिकटून बसतो. एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करताना तो फक्त एका धुण्यात स्वच्छ होईलच असे नाही, एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी बराच वेळ खर्ची होतो. यासाठीच, एक सोपी भन्नाट ट्रिक वापरुन आपण एक्झॉस्ट फॅन वरील चिकट, तेलकट धुळीचा जाडसर थर अगदी काही मिनिटांतच सहज स्वच्छ करू शकतो. फारशी मेहेनत न घेता झटपट मळकट, चिकट झालेला एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याची सोपी युक्ती पाहूयात. 

 एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याची सोपी युक्ती... 

 एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याची करण्यासाठी आपल्याला भांडी घासायचा स्क्रबर, लिव्हिड डिश वॉश सोपं, लिंबाचा रस, बेकिंग सोडा, डिटर्जंट पावडर आणि जुना टूथ ब्रश इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एक्झॉस्ट फॅनची जाळी स्वच्छ करायलाच फार मेहेनत लागते. कारण यावर खूपच चिकट थर साचलेला असतो. एक्झॉस्ट फॅनची जाळी व फॅन स्वच्छ करण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा. गरम पाणी चिकट, तेलकट हट्टी थर सहज काढून टाकण्यास मदत करतो.

बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ५ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात, डिटर्जंट पावडर घालावी. आपण यात लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा देखील घालू शकता. मग या पाण्यांत एक्झॉस्ट फॅनची जाळी व फॅनच्या पाती तासभर भिजवून ठेवाव्यात. जर घाण फारच चिकट, हट्टी असेल तर आपण यात अर्धा कप ब्लिच लिक्विड देखील घालू शकता. तासाभरानंतर पाहिल्यास आपल्याला दिसेल की, एक्झॉस्ट फॅनची जाळी व पात्यावरील चिकटपणा आपोआप सुटायला लागेल.   

साचा न वापरताच करा उकडीचे कळीदार मोदक, पाहा सोपी पद्धत-सुंदर मोदक करा सहज...

एक्झॉस्ट फॅनच्या पाती स्वच्छ करणे म्हणजे खरी कसरत असते. एक्झॉस्ट फॅनच्या पाती स्वच्छ करण्यासाठी डिश वॉश लिक्विड आणि पाण्याचे मिश्रण करुन मायक्रोफायबर कापडाने पुसून घ्यावे. जर डाग अगदीच हट्टी किंवा चिकट असतील तर गरम पाण्यात लिंबाचा रस, बेकिंग सोडा, डिश वॉश लिक्विड सोपं घालून मिश्रण तयार करून घ्यावे. या तयार मिश्रणात स्क्रबर किंवा जुना ब्रश बुडवून एक्झॉस्ट फॅनच्या पाती व जाळी घासून घ्याव्यात. हे मिश्रण आपण एकदाच तयार करून एका स्प्रे बॉटलमध्ये देखील भरून स्टोअर करुन ठेवू शकता. दर १५ दिवसातून किंवा आठवड्याला या स्प्रेची फवारणी करून मग तो घासणी किंवा ब्रशने घासून स्वच्छ धुतला तर त्यावर अजिबात चिकट, तेलकट थर साचत नाही. याचबरोबर, दर १५ दिवसांनी किंवा आठवड्याला १५ मिनिटे काढून एक्झॉस्ट फॅन वेळीच स्वच्छ केल्यास तो फारसा खराब होत नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम अप्लायंस