Join us

महागडे साबण, लिक्विड सोपपेक्षा भारी स्वयंपाकघरातील 'हा’ पदार्थ, भांडी होतील सेकंदात चकाचक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 15:08 IST

Clean Burnt Pots with a Potato : Clean The Bottom of Your Pots or Pans with potato : How To Clean a DIRTY Pan with a Potato : How to Use a Potato to Clean Dirty Pots and Pans : फारशी मेहेनत न घेता फक्त ५ मिनिटांत जळक्या, काळ्या भांड्यांवरचे चिकट, तेलकट, हट्टी डाग काढा सहज....

स्वयंपाक करण्यासाठी आपण किचनमधील काही मोजकी भांडी रोज वापरतो. या भांड्यांमध्ये टोप, कढई, मोठी पातेली यांचा वापर होतो. जेवण बनवण्यासाठी रोज या भांड्यांचा वापर केल्याने कालांतराने भांडी खराब होतात. काही काळाने ही रोजची भांडी अस्वस्च्छ दिसू लागतात. जेवण बनवत असताना कधी -कधी ही भांडी करपतात. कालांतराने त्यांचे पृष्ठभाग काळे (Quick Tips To Clean Burnt Aluminium Utensils At Home) पडू लागतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या पृष्ठभागाशी असलेला तेलकटपण जात नाही. अशी भांडी घासण्यासाठी आपण साबण, स्क्रबर, लिक्विड सोपं यांचा वापर करतो. परंतु काहीवेळा यांचा वापर करुनही भांडी स्वच्छ होत नाहीत(easy ways to clean Aluminum utensils).

किचनमधील टोप, कढई, पातेली यांचे काळे झालेले पृष्ठभाग अस्वच्छ दिसतात. भांड्यांवरील हे जळके काळे डाग (Easy Hacks to Clean a Burnt Vessel) स्वच्छ करण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. स्क्रबरने (How to Use a Potato to Clean Dirty Pots and Pans) घासून देखील काहीवेळा हे डाग जात नाहीत. अशावेळी आपण अनेक उपाय करून पाहतो. जर आपल्याला फारशी मेहेनत न घेता झटपट भांड्यांच्या तळाशी असलेले काळे डाग काढायचे असतील तर एका सोप्या घरगुती टिप्सचा वापर करू शकतो. (One solution to clean tough burn stains from utensils).

भांड्यांच्या तळाशी असलेले काळे डाग कसे काढायचे ? 

भांड्यांच्या तळाशी असलेले काळे डाग काढणासाठी आपण साबण, लिक्विड सोपचा वापर करतो. परंतु काहीवेळा हे करपट, जळके डाग इतके हट्टी असतात की भांडयांच्या पृष्ठभागावरून निघता निघत नाहीत. अशावेळी आपण चक्क किचनमधील बटाटा चिरुन त्याने ही काळीकुट्ट झालेली भांडी अगदी मिनिटभरात स्वच्छ करू शकतो. बटाट्याने भांडी स्वच्छ करताना आपल्याला फारशी मेहनत देखील घ्यावी लागणार नाही. इंस्टाग्रामवरील alshihacks या अकाउंटवरुन भांड्यांच्या पृष्ठभागावरील काळेकुट्ट डाग घालवण्याचा सर्वात सोपा उपाय शेअर करण्यात आला आहे. 

घरभर झुरळं फिरतात? ‘हा’ खास उपाय करा, एक झुरळ घरात दिसणार नाही-कायमचा बंदोबस्त...

सोन्याच्या बांगड्या काळपट दिसतात, चमक गेली? ४ टिप्स, सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय...

सर्वातआधी एक बटाटा घेऊन तो बरोबर मधोमध कापून त्याचे २ तुकडे करून घ्यावेत. आता हा कापलेला बटाटा थेट भांड्यांच्या काळ्याकुट्ट पृष्ठभागावर घासून घ्यावा. त्यानंतर साधारणतः मिनिटभर घासल्यावर थोड्या वेळासाठी भांडं तसेच ठेवून द्यावे. मग भांडं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. मग लिक्विड सोपं किंवा साबणाने भांडं पुन्हा एकदा घासून स्वच्छ धुवून घ्यावे. यानंतर, आपण भांड्यांमध्ये फरक स्वतः बघू शकता. 

तांदुळाचे पाणी फक्त चेहऱ्यालाच लावू नका! घराच्या कानाकोपऱ्यांची करा स्वच्छता - कपभर पाणी करेल घर लख्ख...

अशाप्रकारे, जळक्या भांड्यांवरील काळेकुट्ट डाग घालवण्यासाठी तासंतास भांडी घासत बसण्यापेक्षा बटाट्याच्या मदतीने हे डाग अगदी मिनिटभरात काढू शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स