Join us
Daily Top 2Weekly Top 5

माठातील पाणी की फ्रीजमधलं बर्फगार पाणी? उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोणतं पाणी चांगलं? कुणी काय प्यावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2026 11:34 IST

clay pot water benefits: matka water vs fridge water: summer hydration tips: उन्हाळ्यात नेमकं कशातलं पाणी प्यायला हवं? आरोग्याच्यादृष्टीने फ्रिजचं चिल्ड वॉटर की माठातलं नैसर्गिक थंड पाणी चांगलं आहे? आयुर्वेद काय सांगत जाणून घेऊया.

उन्हाळा वाढला की आपल्याला भरपूर तहान लागते. प्रचंड ऊन, अंगाची होणारी लाहीलाही आणि घशाला पडलेली कोरड... अशावेळी आपल्याला वेध लागतात ते थंड पाणी पिण्याचे.(clay pot water benefits) अनेकजण घरी आल्यावर थेट फ्रिज उघडतात आणि बर्फासारखं थंड पाणी घटाघटा पितात. तर अनेक घरांमध्ये आजही मातीच्या माठाला पसंती दिली जाते.(matka water vs fridge water) पण उन्हाळ्यात नेमकं कशातलं पाणी प्यायला हवं? आरोग्याच्यादृष्टीने फ्रिजचं चिल्ड वॉटर की माठातलं नैसर्गिक थंड पाणी चांगलं आहे? आयुर्वेद काय सांगत जाणून घेऊया. (summer hydration tips)

अनुष्का शर्मा ते दीपिका पादुकोण, बॉलीवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची किंमत ऐकून बसेल धक्का, मंगळसुत्रांच्या सुंदर डिझाइन्स

उन्हाळ्यात पाणी पिणं हे केवळ तहान भागवण्यासाठी नसतं तर ते शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीही आवश्यक असते. आपण कोणत्या प्रकारचे पाणी पितो, यावर आपल्या आरोग्याचे तापमान अवलंबून असते. 

फ्रीजमधील पाणी हे कृत्रिमरित्या थंड केले जाते. जेव्हा आपण हे थंड पाणी पितो तेव्हा शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो. फ्रीजचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि पचनसंस्थेवर ताण येतो. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. अति थंड पाण्यामुळे घशातील ग्रंथींना सूज येऊ शकते. ज्यामुळे खोकला, घसा खवखवणे आणि टॉन्सिल्सचा त्रास उद्भवतो. 

माठातील पाणे नैसर्गिकरित्या थंड होते. माठाला असलेल्या सूक्ष्म छिद्रांमधून पाण्याचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. हे पाणी शरीराला थंडावा तर देते पण घशाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील आम्लता कमी करुन पाण्याचा pH स्तर संतुलित होतो. माठातील पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढते. हे पाणी पचायला हलके असल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. 

आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात पित्ताचा त्रास अधिक वाढतो. फ्रीजमधील गार पाणी पित्त कमी करण्याऐवजी शरीरात विषारी घटक तयार करते. तर माठातील पाणी हे शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यास मदत करते. 

ज्यांना सतत सर्दी, खोकला किंवा दम्याचा त्रास असतो. त्यांनी फ्रीजचे पाणी पिऊ नये. फ्रीजच्या पाण्यामुळे घशातील कफ वाढतो. याउलट माठातील पाणी घशाला कोमटपणा आणि थंडावा देते. ज्यामुळे घसा खवखवण्याची समस्या उद्भवत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clay pot water or fridge water: Best summer hydration?

Web Summary : Clay pot water is better for summer hydration than fridge water. It cools naturally, balances pH, boosts metabolism, and aids digestion, according to Ayurveda. Fridge water can cause health issues.
टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्ससमर स्पेशल