साधारणपणे सात ते दहा वर्षांची मुलं आपल्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातून नक्की काय विकत घेतील? एखादं महागडं खेळणं, व्हिडिओ गेम किंवा चॉकलेट्स! पण चीनमधील हेबेई प्रांतात राहणाऱ्या एका १० वर्षांच्या चिमुरडीने मात्र जगावेगळी वाट निवडली. जेव्हा तिच्या वयाची मित्रमंडळी बाहुल्यांशी खेळण्यात दंग होती, तेव्हा ही मुलगी भविष्यातील आर्थिक नियोजनाचे धडे गिरवत होती. तिने घेतलेल्या एका निर्णयाने आज मोठमोठ्या अनुभवी गुंतवणूकदारांना आणि अर्थतज्ज्ञांनाही विचार करायला भाग पाडले आहे(Chinese Girl Buys Gold With Gift Money To Hide From Parents).
अवघ्या १० व्या वर्षांपासून तिने तिच्या बचतीचे रूपांतर सोन्यात करायला सुरुवात केली. यामागे तिचं एक बालसुलभ पण अत्यंत 'स्मार्ट' कारण होतं - तिचे पालक तिचे पैसे खर्च करतील ही भीती तिला वाटत होती, यासाठी आपली रोकड सुरक्षित राहावी आणि तिचे मूल्य वाढावे, या उद्देशाने तिने सोन्याची निवड केली. आज जेव्हा सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तेव्हा या मुलीची गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढली आहे. अवघ्या १० व्या वर्षी 'गोल्डन गर्ल' म्हणून (Chinese teenager gold investment viral) प्रसिद्ध झालेली ही मुलगी केवळ नफा कमावत नाही, तर ती जगाला बचतीचे आणि गुंतवणुकीचे नवे धडे शिकवत आहे. तिची ही थक्क करणारी गोष्ट आजच्या पिढीसाठी आणि पालकांसाठी खूपच आवश्यक आहे...
पालक पैसे खर्च करतील या भीतीने चिमुकलीने लढवली शक्कल...
चीनमधील एका दहा वर्षांच्या मुलीची हुशारी सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. चिनी नववर्षाच्या वेळी मोठ्यांकडून भेट म्हणून मिळालेले पैसे जपून ठेवण्यासाठी तिने शोधलेला मार्ग सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. ते पैसे आई-वडील वापरतील या भीतीने तिने सोने खरेदी करून ठेवले, ज्यामुळे तिला आता लाखोंचा फायदा झाला आहे.
तूप खाणं सोडलंय? लठ्ठ असाल तरीही रोज खा 'इतके' चमचे तूप; हृदयविकाराचा धोका टळून होईल वेटलॉसही...
उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील लँगफांग शहरात राहणाऱ्या या मुलीने २०२३ पासून सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. या मुलीला दरवर्षी चिनी नववर्षाच्या निमित्ताने 'लाल पाकिटातून' (Hong Bao) शगुन म्हणून काही युआन मिळतात. प्रत्येक वर्षी तिला नवीन वर्षाची भेट म्हणून सुमारे ४,००० युआन (अंदाजे ४८,००० रुपये) मिळायचे. आपल्याकडील पैसे आई-वडील घरातील कामांसाठी किंवा इतर कारणांसाठी खर्च करतील, या चिंतेमुळे तिने सोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पैशांपेक्षा सोने अधिक (viral news Chinese girl gold investment) सुरक्षित आहे, असा विश्वास ठेवून ती दरवर्षी मिळणाऱ्या रकमेतून सोने खरेदी करून जमा करत होती.
मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिने पहिल्यांदा सोने खरेदी केले तेव्हा प्रति ग्रॅम किंमत सुमारे ४६० युआन (अंदाजे ५,५०० रुपये) होती. पण यावर्षी फेब्रुवारीपर्यंत सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १,१०० युआन (अंदाजे १३,००० रुपये) पर्यंत वाढली. आतापर्यंत या मुलीने सुमारे ३० ग्रॅम सोने जमा केले आहे. भविष्यातही भेट म्हणून मिळणाऱ्या पैशातून अधिक सोने खरेदी करण्याचा तिचा विचार आहे. तिने गुंतवलेले पैसे आज दुपटीहून अधिक झाले आहेत. सोन्याच्या किमती ज्या प्रकारे गगनाला भिडल्या आहेत, ते पाहता या १० वर्षांच्या मुलीला आता लोक खऱ्या अर्थाने "जीनियस इन्व्हेस्टर" म्हणत आहेत.
डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ सुपरफूड्स...
खेळण्यांच्या जगात रमण्याऐवजी सोन्याची निवड करणाऱ्या या मुलीने केवळ नफाच कमावला नाही, तर 'बचत' आणि 'गुंतवणूक' ही केवळ मोठ्या माणसांचीच कामे आहेत, हा समज मोडीत काढला आहे. सणासुदीला मिळणाऱ्या शगुनच्या पैशांने सोनं खरेदी करणे, ही तिची कल्पना आज अनेकांसाठी बचतीचा आदर्श ठरत आहे. शेवटी, तिची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की, संपत्ती किती आहे यापेक्षा ती कशी आणि कुठे गुंतवली जाते, हे जास्त महत्त्वाचे आहे.
Web Summary : Chinese girl, fearing parents would spend her gift money, invested in gold. Her investment doubled as gold prices soared, teaching valuable savings lessons.
Web Summary : चीनी लड़की को डर था कि माता-पिता उपहार के पैसे खर्च कर देंगे, इसलिए उसने सोने में निवेश किया। सोना महंगा होने से उसका निवेश दोगुना हो गया, जिससे बचत का महत्वपूर्ण सबक मिला।