Join us

चिनी सुपरमार्केट झाले बंद, ड्रॅगनफ्रुटमध्ये कोरोना व्हायरस असल्याच्या चर्चेने घबराट, हे खरं की अफवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 17:49 IST

Social viral: कोरोना संदर्भात आलेल्या या नव्या वृत्ताने आता एकच खळबळ माजवली आहे. आतापर्यंत खाद्य पदार्थांमधून कोरोना (corona virus in fruit) पसरत नव्हता, पण आता मात्र चक्क ड्रॅगन फ्रुटमध्येच कोरोना व्हायरस सापडल्याचे वृत्त आहे...

ठळक मुद्देचीनच्या झेजियांग आणि जियांग्शी प्रांतातील ९ शहरांमध्ये याबाबतीतली फळ तपासणी झाली होती.

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनने (omicron) आता जगभरात एकच हाहाकार केला आहे.. हळूहळू ओमायक्रॉनचा विळखा अख्ख्या जगाभोवती पडत चालला असून कोणताच देश या व्हायरसच्या प्रभावातून सुटलेला नाही. एकीकडे ओमायक्रॉनबाबत आधीपासूनच जगभरात चिंतेचं वातावरण असताना आणि या नव्या वृत्ताने मात्र अनेकांना धडकी भरवली आहे. काही तासांपुर्वी चीनमध्ये ड्रॅगन फ्रुटमधे (corona virus in dragon fruit) कोरोना व्हायरस असल्याचे तपासात समोर आले आहे. 

 

याबाबत असे सांगितले जात आहे की ज्या ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले, ती फळे व्हिएतनाम येथून आयात करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वीही ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना विषाणू आहे की नाही, याबाबत तपासणी करण्यात आली होती. तेव्हा देखील समोर आलेल्या काही बाबींवरून ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना विषाणू असू शकतो, अशी दाट शंका संशोधकांना होती. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या तपासणीवरून ही बाब पुन्हा एकदा खरी ठरली आहे. चीनच्या झेजियांग आणि जियांग्शी प्रांतातील ९ शहरांमध्ये याबाबतीतली फळ तपासणी झाली होती. मात्र अजून या बाबतीत काही संशोधन होणे आणि काही तपासण्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

 

तुर्तास जी काही माहिती समोर आली आहे, त्यानुसार चीनने खबरदारी घेत कोरोना संदर्भातले काही निर्बंध आणखी कडक केले आहेत. चीनमधील सुपर मार्केट (fruit markets in China) तातडीने बंद करण्यात आले असून ड्रॅगन फ्रुट विक्रेते आणि ग्राहक या सगळ्यांनाच पुढील १४ दिवस क्वारंटाईन (quarantine) राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या आयातीवर पुढील काही दिवस बंदी घालण्यात आली असून परदेशातून आयात होणाऱ्या पदार्थांची चाचणी कशी करावी, यासंदर्भात आता तेथील प्रशासन विचार करत आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलकोरोना वायरस बातम्याचीनफळेओमायक्रॉन