lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

मूल सांभाळण्यासाठी बाॅलिवूड हाॅलिवूडचे कलाकार नॅनींना पगारापोटी मोजतात लाखो रुपये..करिना-ॲंजेलिना नॅनींना किती पगार देतात हे माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 02:28 PM2022-04-29T14:28:55+5:302022-04-29T15:04:23+5:30

मूल सांभाळण्यासाठी बाॅलिवूड हाॅलिवूडचे कलाकार नॅनींना पगारापोटी मोजतात लाखो रुपये..करिना-ॲंजेलिना नॅनींना किती पगार देतात हे माहिती आहे का?

Check out the five-figure package of nanny handling Celebrity Kids. | तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

Highlightsसार्वजनिक जीवनात, कामाच्या पातळीवर बिनधास्त वावरणाऱ्या अभिनेत्री मूल सांभाळण्यासाठी नेमके किती पैसे मोजतात याबद्दल सामान्यांना प्रचंड कुतुहल असतं.सेलिब्रिटी नॅनींना पगार देताना मुलांच्या सुरक्षिततेचा आणि आनंदाचा पैशापेक्षा जास्त विचार करतात. 

सध्या माध्यमात सेलिब्रेटींसोबत त्यांची चिमुकली मुलं देखील दिसतात. बाळंतपणानंतर काही दिवसातच बाॅलिवूड, हाॅलिवूडच्या अभिनेत्री सार्वजनिक जीवनात वावरताना दिसतात. कामावर परततात. शुटींगच्या शेड्यूलमध्ये व्यस्त होतात. त्यांच्या पार्ट्यांमधील फोटो पाहिले की सामान्यजनांना त्यांच्या मुलांचा विचार हमखास येतो. पण या सेलिब्रेटी आपली मूलं सांभाळायला नॅनी ठेवतात हे ही लोकांना माहिती असतं. सार्वजनिक जीवनात, कामाच्या पातळीवर बिनधास्त वावरणाऱ्या या अभिनेत्री मूल सांभाळण्यासाठी नेमके किती पैसे मोजतात याबद्दल सामान्यांनाही कुतुहल असतं. प्रत्यक्षात करिना असू  देत किंवा हाॅलिवूडची ॲंजेलिना जोली आपल्या मुलांना नॅनींच्या हातात सोपवताना पैशांचा विचार करण्यापेक्षा मुलांच्या आनंदाचा आणि सुरक्षिततेचा जास्त विचार करतात. या एका कारणासाठीच सामान्यांच्या भुवया उंचावतील एवढे पगार ते नॅनींना मोजतात.

Image: Google

1. सेलिब्रेटी किड्स म्हटलं की आधी तैमूरचं नाव येतं, इतका तैमूर लहान वयातच प्रसिध्द झाला. प्रसिध्दी माध्यमात तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीचा फोटोही अनेकदा प्रसिध्द झाला. तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीचं नाव सावित्री. करिना आणि सैफ अली खान तैमूरला सांभाळण्यासाठी महिन्याला दीड लाख रुपये सावित्रीला द्यायचे. याची जेव्हा माध्यामत चर्चा व्हायला लागली, प्रत्यक्ष करिनालाही याबद्दल विचारलं गेलं तेव्हा करिना, ' मूल सुरक्षित हातात असणं महत्वाचं. त्याचा आनंद आणि सुरक्षिततेचा विचार करता पैसा हा मुद्दा महत्वचा नाही' असं म्हणाली होती. 

 

Image: Google

2. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर् यांनी 2019 मध्ये आपलं मूल सांभाळण्यासाठी तैंमूरच्या नॅनीचाच विचार केला. मूल सांभाळण्यासाठी मीरा आणि शाहिद सावित्रीला महिन्याला 80,000 रुपये देत होते. 

Image: Google

3. किरण आणि आमिर खान यांचा मुलगा आझाद हा आता 10 वर्षांचा झाला आहे. पण तो जेव्हा अगदी लहान होता तेव्हा जिथे तिथे तो नॅनीसोबतच दिसायचा. आझादच्या नॅनीचं वर्षाचं पॅकेज 2.5 कोटी रुपयांचं होतं. 

Image: Google

4. किम कर्दाशियन ही अमेरिकन माॅडेल जगभरात प्रसिध्द आहे. किम कर्दाशियन आणि क्ने वेस्ट या जोडप्यानं आपल्या मुलांना सांभाळायला एक नॅनींची टीमच ठेवली आहे. या टीमला  हे जोडपं पगारापोटी 50,000 ते 1 लाख डाॅलर महिन्याला मोजतात.

Image: Google

5. हाॅलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री ॲंजेलिना जोली मुलांना सांभाळणाऱ्या नॅनींंना त्यांच्या कामाचे 900 हजार डाॅलर ( भारतीय रुपयात 6,86, 50, 785 रुपये)  पगारापोटी देते. बाकी एकूण सर्व खर्च धरता ॲंजेलिना जोली आणि ब्रॅड पिट हे जोडपं मुलांसाठी वर्षाला 1 कोटी डाॅलर खर्च करतात अशी माध्यमात चर्चा आहे. 

Web Title: Check out the five-figure package of nanny handling Celebrity Kids.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.