Join us
Daily Top 2Weekly Top 5

खिडकीत कबुतरांचा उच्छाद? काळ्या पिशवीचा १ उपाय, कबुतरं घरात येत नाहीत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:59 IST

Cheap Trick To Keep Pigeons Away From Balcony : हा घरगुती उपाय बराच चर्चेत आहे :

घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत कबुतरं येत असतील तर फक्त अस्वच्छता परसत नाहीतर फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीसुद्धा हे धोकादायक ठरू शकते. बरेच लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी नेट लावतात जे खूपच खर्चिक असतात तर काहीजण आजकाल काळ्या पिशवीचा वापर करतात. हा घरगुती उपाय बराच चर्चेत आहे. (How To Keep Pigeons Away From Balcony)

ही छोटी ट्रिक विज्ञानावर आधारीत आहे. ज्यामुळे कबुतरांना  नैसर्गिकरित्या भिती दाखवता येईल.  जर तुम्हीसुद्धा कबुतरांच्या घाणीमुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही काही मिनिटांत साफ-स्वच्छ घर ठेवू शकता. (Cheap Trick To Keep Pigeons Away From Balcony By Using Black  Foil)

काळ्या पिशवीचा हा उपाय काय आहे?

कबुतरांना पळवण्यासाठी सगळ्यात हिट पद्धत म्हणजे काळ्या पिशवीचा वापर. कबुतरांना कावळ्यांची भिती असते. कबुतरं कावळ्यांना घाबरतात कारण ते कबुतरांच्या अंड्यांना नुकसान पोहोचवतात. काळ्या पिशवीचा हा उपाय करून तुम्ही  कोणताही जास्तीचा खर्च  न करता कबुतरांना घरापासून दूर ठेवू शकता. 

न लाटता, न पीठ मळता करा १ वाटी गव्हाच्या पिठाचा पोळा; ५ मिनिटांत नाश्ता-पोळा म्हणा किंवा धिरडं..

 काळ्या पिशवीचा वापर कसा करावा?

एक काळी पॉलिथीन घ्या. त्यात थोडे रद्दी कागद किंवा जुना कापूस भरा. एका मोठ्या कावळ्याप्रमाणे आकार दिसेल अशी पिशवी बांधा. बाल्कनीची रेलिंग किंवा गच्चीच्या कोपऱ्यावर लटकवून ठेवा जिथे कबुतरं सगळ्यात जास्त येतात. ही पिशवी पाहून कबुतरांना कावळा बसल्याचा भास होईल आणि कावळे घाबरून दूर पळतील.

जुनी सिडी डिस्क

घरात पडलेल्या जुन्या  सिडी डिस्कचा वापर करून तुम्ही कबुतरांना घालवू शकता.   जुन्या सिडीचा वापर करा कारण कबुतरांचे डोळे खूपच संवेदनशील असतात. त्यांना अचानक समोर येणारी चमक नको असते. घरात जुनी पडलेली सीडी डिस्क बाल्कनीत धाग्यात लटकवा. जेव्हा सुर्याचा प्रकाश पडेल आणि हवा येईल ते रिफ्लेक्शन कबुतरांना पळवून लावेल.

 

बारीक व्हायचंय-डाएट जमत नाही? १ चमचा 'या' बिया खा, वजन व्हायला लागेल कमी

एल्युमिनियम फॉईल

स्वयंपाकघरात वापरलं जाणारं एल्युमिनियम फॉईल कबुतरांना दूर पळवण्यास परिणामकारक ठरते.  हवा आल्यानंतर हे फॉईल चमकते. ज्यामुळे कबुतरांच्या डोळ्यांना त्रास होतो  त्यामुळे कबुतरांना पळवण्यासाठी हे फॉईल फायदेशीर ठरते.  कबुतरं कमी झाली की आपोआप घाण कमी होऊ लागते आणि बाल्कनी स्वच्छ दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pigeon problem solved: Black bag trick keeps birds away!

Web Summary : Pigeons causing a mess? Use black bags, old CDs, or aluminum foil to scare them away. This cheap, science-based trick deters pigeons, keeping your balcony clean and healthy.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स