Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > तुमची पर्स तुमचा जीव वाचवू शकते का? पर्स साधी असो की फॅन्सी, ‘या’ वस्तू पर्समध्ये हव्याच..

तुमची पर्स तुमचा जीव वाचवू शकते का? पर्स साधी असो की फॅन्सी, ‘या’ वस्तू पर्समध्ये हव्याच..

Can your purse save your life? these are the things you need in your purse : पर्समध्ये या वस्तू नक्कीच असायला हव्यात. ही घ्या यादी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 15:34 IST2026-02-05T15:32:44+5:302026-02-05T15:34:10+5:30

Can your purse save your life? these are the things you need in your purse : पर्समध्ये या वस्तू नक्कीच असायला हव्यात. ही घ्या यादी.

Can your purse save your life? these are the things you need in your purse. | तुमची पर्स तुमचा जीव वाचवू शकते का? पर्स साधी असो की फॅन्सी, ‘या’ वस्तू पर्समध्ये हव्याच..

तुमची पर्स तुमचा जीव वाचवू शकते का? पर्स साधी असो की फॅन्सी, ‘या’ वस्तू पर्समध्ये हव्याच..

महिलांची पर्स ही केवळ फॅशन अॅक्सेसरी नसून एक अत्यावश्यक वस्तू आहे. घराबाहेर पडताना पर्समध्ये किंवा बॅगेत काय असायला हवे याची यादी नक्कीच माहिती असावी. (Can your purse save your life? these are the things you need in your purse.) दिवसभर ऑफिस, कॉलेज, प्रवास किंवा घरकामाच्या धावपळीत अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी पर्समध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असणं खूप गरजेचं आहे. 

१. त्वचा आणि सौंदर्याच्या बाबतीत अतिशय कमी पण आवश्यक गोष्टी पुरेशा ठरतात. ओठ कोरडे पडू नयेत यासाठी लिप बाम किंवा साधी लिपस्टिक, चेहर्‍यावरचा थकवा लपवण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आणि छोटा आरसा एवढंच मेकअपसाठी पुरेसं असतं. हे केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर स्वत:बद्दल चांगलं वाटण्यासाठी आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठीही मदत करतं. एक सनस्क्रिन नक्की असावं. 

२. आरोग्याच्या दृष्टीने पाहीलं तर स्वच्छतेशी संबंधित वस्तूंना पर्स मध्ये प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक आहे. सॅनिटायझर आणि ओले टिश्यू सार्वजनिक ठिकाणी हात स्वच्छ ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. आजारपण टाळण्यासाठी ही छोटी सवय मोठा फरक घडवू शकते. याचबरोबर सॅनिटरी पॅड किंवा मेंस्ट्रुअल कप पर्समध्ये असणं प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचं आहे, कारण मासिक पाळी अनेकदा अनपेक्षितपणे येते. अशा वेळी ही तयारी महिलेला मानसिक ताणापासून वाचवते आणि गरज पडल्यास इतर महिलेलाही मदत करता येते.

३. दिवसभरात कधी डोकेदुखी, पोटदुखी, अॅलर्जी किंवा छोट्या जखमा होऊ शकतात. अशा प्रसंगी उपयोगी पडतील अशी बेसिक औषधे, बँड-एड आणि छोटी अँटिसेप्टिक क्रीम पर्समध्ये असणं फायदेशीर ठरतं. यासोबतच पाणी आणि एखादा हलका एनर्जी स्नॅक ठेवल्यास अशक्तपणा, चक्कर येणं किंवा अचानक भूक लागणं यावर तात्काळ उपाय करता येतो, विशेषतः प्रवासात किंवा कामाच्या धावपळीत.

४. सुरक्षेच्या दृष्टीने महिलांची पर्स अधिक सजग असायला हवी. मोबाइल हा आजचा सर्वात महत्त्वाचा संपर्काचे साधन असल्यामुळे पॉवर बँक किंवा चार्जर जवळ असणं फार गरजेचं आहे. आपत्कालीन परिस्थितीत फोन बंद पडणं धोकादायक ठरु शकतं. त्याचप्रमाणे पेपर स्प्रे, सेफ्टी अलार्म किंवा आपत्कालीन संपर्क क्रमांक लिहिलेली चिठ्ठी पर्समध्ये ठेवणं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरतं.

५. ओळखपत्रांची झेरॉक्स कॉपी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ऑफिस आयडी आणि थोडे रोख पैसे पर्समध्ये असणं कधीही उपयोगी पडू शकतं. डिजिटल युगातही रोख पैशांची गरज अचानक भासू शकते. आनलाइन पेमेंटा पर्याय असला तरी थोडी कॅश असावीच.

Web Title : पर्स में होनी चाहिए ये चीजें, जो बचा सकती हैं आपकी जान

Web Summary : महिलाओं का पर्स फैशन से बढ़कर है। इसमें मेकअप, सैनिटाइजर, सैनिटरी पैड, दवाएं, सुरक्षा उपकरण, पहचान पत्र और कुछ नकदी होनी चाहिए। ये चीजें सुरक्षा और आत्मविश्वास सुनिश्चित करती हैं, अप्रत्याशित स्थितियों में मदद करती हैं।

Web Title : Purse Essentials: How Your Handbag Can Save Your Life

Web Summary : A woman's purse is more than fashion. Essential items include basic makeup, hygiene products like sanitizer and sanitary pads, basic medicines, safety tools, identification, and some cash for unexpected situations. Being prepared with these items ensures safety and confidence.